Virat Kohli tore a note of Rs 50, danced and went home; What a baffling thing ...- | विराट कोहलीने ५० रुपयांची नोट फाडली, डान्स केला आणि घरी गेला; काय आहे ही चक्रावून टाकणारी गोष्ट...-
विराट कोहलीने ५० रुपयांची नोट फाडली, डान्स केला आणि घरी गेला; काय आहे ही चक्रावून टाकणारी गोष्ट...-

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीची एक चक्रावून टाकणारी गोष्ट पुढे आली आहे. कोहलीने पन्नास रुपयांची नोट फाडून तिचे तुकडे केले, ते तुकडे हवेत भिरकावले, त्यानंतर डान्स करून कोहली घरी परतला होता... आता कोहलीने नेमके असे केले तरी का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

कोहलीची एक खास मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये कोहलीने आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टींना उजाळा दिला. बाल कलाकार इनायतने ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये विराटने सांगितलेली गोष्ट कदाचित कोणाला माहितीही नसेल.

याबाबत विराट म्हणाला की, " दिल्लीमध्ये लहानपणी राहत असताना काही गोष्टी मी पाहिल्या होत्या. दिल्लीमध्ये कुठे लग्नसराई सुरु असेल तर तिथे डान्स केला जायचा. यावेळी तिथली लोकं पैसे हवेत उडवायची आणि त्यानंतर डान्स करायची. मीदेखील हे बऱ्याचदा पाहिले होते, पण तसे केले मात्र नव्हते. पण एकेदिवशी आईने मला घरातील काही सामान आणण्यासाठी ५० रुपयांची नोट दिली होती, ती घेऊन मी घराबाहेर पडलो होतो." 

कोहली पुढे म्हणाला की, " आईने दिलेला ५० रुपयांची नोट मी बाहेर घेऊन पडलो. त्यावेळी तिथे काही लोकं नाटत होती. तिथे मी गेलो. ५० रुपयांची नोच फाडली. तिचे तुकडे उडवले आणि मी डान्स केला. डान्स करून झाल्यावर मी सामान न घेता घरी पोहोचलो होतो. ही सारी घडलेली हकिकत मी आईला सांगितली. " 

Web Title: Virat Kohli tore a note of Rs 50, danced and went home; What a baffling thing ...-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.