Virat Kohli receives India's Best Person of the Year award | विराट कोहलीला मिळाला भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा खास पुरस्कार
विराट कोहलीला मिळाला भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा खास पुरस्कार

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराटला भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा खास पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्याला मैदानातील कामगिरीमुळे नाही तर अन्य काही गोष्टींमुळे मिळाला आहे.

विराट कोहली हा प्राणीप्रेमी आहे. काही दिवसांपूर्वी कोहलीने काही श्वानांना दत्तक घेतले होते. त्याचबरोबर प्राण्यांच्या हत्या करण्याच्या विरोधत तो असतो. त्यामुळे 'पेटा' या प्राणीमित्र संघटनेने कोहलीचा भारतातील सर्वोत्तम व्यक्तीचा खास पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

कोहलीने काही दिवसांपूर्वी अपंगत्व आलेल्या १५ श्वानांना दत्तक घेतले होते. बऱ्याचदा कोहलीने भूतदया दाखवली आहे. त्यामुळे कोहलीला हा पुरस्कार मिळाल्याचे समजते.

Image result for virat kohli with dogs

Web Title: Virat Kohli receives India's Best Person of the Year award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.