Virat Kohli posted Goofy Pic in which The Funniest Memes made, Mohammed shami and prithvi shaw are also in this pic | 'चिकना' विराट कोहली 'चकणा' होतो तेव्हा...; दोस्तांचा फोटो धम्माल, मीम्स त्याहून धमाकेदार

'चिकना' विराट कोहली 'चकणा' होतो तेव्हा...; दोस्तांचा फोटो धम्माल, मीम्स त्याहून धमाकेदार

भारताचा कर्णधार विराट कोहली हा नेहमीच चर्चेत असतो. विराट आणि अनुष्का यांना चाहते बऱ्याचदा ट्रोलही करत असतात. सध्याच्या घडीला कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चर्चेला कारण ठरले आहे ते त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो...

कोहलीच्या तंदुरुस्तीबरोबर तो किती चिकना आहे, याचीही चर्चा काही वेळेला होते. पण या फोटोमध्ये तर तो चकणा असल्याचे पाहायला मिळत आहे. पण त्याने ही गोष्ट का केली आहे, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. कोहलीबरोबर या फोटोमध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर पृथ्वी शॉ हे दोघेही आहेत. पण या दोघांनीही या फोटोमध्ये वेगळीच पोझ दिली आहे.

कोहलीला वेड लागलंय की, काय... असं हा फोटो पाहून काही जणांनी कमेंट केल्या असतील. पण सध्याच्या घडीला भारतीय संघ विश्रांती घेत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा सराव सामना संपला आणि आता कसोटी मालिकेला काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्याच्या घडीला थोडी मजा मस्ती करताना दिसत आहे.

आपण सर्वच सोशल मीडियावर पोस्ट किंवा चॅटींग करत असतो. त्यावेळी काही इमोजी आपण पाहतो. त्या इमोजीनुसार कोहली, शमी आणि शॉ यांनी आपल्या पोझेस दिल्या आहेत. कोहलीने हा फोटो काल आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे. ट्विटरवर पोस्ट करताना त्याने Naya post Sundar dost, असे म्हटले होते. या फोटोला आतापर्यंत १.५ लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर सात हजार जणांनी हे रिट्विट केले आहे.

 

 

 

 

 

 

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यातच न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

 भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातला सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियानं गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले. पहिल्या डावातील 28 धावांच्या आघाडीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवशी 4 बाद 252 धावा करताना सामना अनिर्णित राखला आहे.

Web Title: Virat Kohli posted Goofy Pic in which The Funniest Memes made, Mohammed shami and prithvi shaw are also in this pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.