Virat Kohli confesses to crime; The partner named the secret | विराट कोहलीने दिली गुन्ह्याची कबुली; साथीदाराचे नाव ठेवले गुपित
विराट कोहलीने दिली गुन्ह्याची कबुली; साथीदाराचे नाव ठेवले गुपित

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या एका गुन्ह्याची कबुली आज दिली आहे. हा गुन्हा करताना आपल्याबरोबर जो साथीदार होता, त्याचीची हिंट विराटने दिली आहे.

कधी कधी माणसाकडून एखादी गोष्ट घडून जाते. त्यावेळी त्याचा स्वत:वरही काही वेळेला ताबा नसतो. काही गोष्टी घडल्यावर आपल्याला कळतात. असेच काहीसे कोहलीच्या बाबतीतही झाल्याची शंका काही जणांना येत होती. पण कोहलीने नेमका गुन्हा तरी कोणता केला आणि त्याचा साथीदार आहे तरी कोण, हे जाणून घ्या...

कोहलीने आपण चोरी केल्याची कबुली दिली आहे. आपल्याबरोबर या चोरीमध्ये कोण साथीदार होता, हेदेखील कोहलीने यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही चोरी क्रिकेटच्या मैदानात केल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे.

कोहलीने एक ट्विट पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये कोहलीने आपण बऱ्याचदा या खेळाडूबरोबर धावा चोरल्या आहेत, असे कोहलीने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

 

जीव धोक्यात घालून तो कोहलीला मैदानात भेटला अन्...
 आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली. एक चाहता आपला जीव धोक्यात घालून मैदानात शिरला आणि थेट भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दिशेने धावत सुटला. त्यानंतर जे काही घडले, ते पाहण्यासारखे होते.

भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात एक रंजकदार गोष्ट पाहायला मिळाली. एका चाहत्याने आपल्या अंगावर विराटचे नाव लिहिले होते. अचानक हा चाहता आपल्या आसनावरून उठला. समोर असलेली मोठी जाळी त्याने ओलांडली. ही जाळी ओलांडत असताना तो पडणार होता, पण थोडक्यात वाचला. जर तो पडला असता तर त्याला नक्कीच बर मार बसला असता आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता.

जाळीवरून उडी मारून हा चाहता थेट मैदानात पोहोचला. मैदानात भारतीय संघ एकत्रितपणे उभा होता. हा चाहता धावत भारतीय संघावर पोहोचला. तिथे उभ्या असलेल्या कोहलीला तो भेटला. त्यावेळीच काही सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्या चाहत्याची धरपकड करायला त्यांनी सुरुवात केली. यावेळी कोहलीने या सुरक्षा रक्षकांना थांबवले आणि त्या चाहत्याला शांतपणे घेऊन जाण्यास सांगितले.

Web Title: Virat Kohli confesses to crime; The partner named the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.