Viral Video An elderly woman advised MS Dhoni to keep the name of his son 'Roshan' if he ever has one | Video : आता तुला मुलगा होईल अन् त्याचं नाव 'रोशन' ठेव, आजीबाईंचा MS Dhoniला मायेचा सल्ला

Video : आता तुला मुलगा होईल अन् त्याचं नाव 'रोशन' ठेव, आजीबाईंचा MS Dhoniला मायेचा सल्ला

 भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) चा जगभरात चाहता वर्ग आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत धोनीचे चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही त्याच्या चाहतावर्ग कमी झालेला नाही. याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत एका जाहीरातीचं चित्रिकरण करणाऱ्या धोनीला भेटण्यासाठी या आजीबाई पोहोचल्या. त्यांनी धोनीला फक्त आशीर्वाद दिला नाही तर एक मायेचा सल्लाही दिला. धोनीही त्यांचं बोलणं नम्रपणे ऐकत होता.  

स्तुती करता करता आजीबाईंनी धोनीला दुसऱ्या मुलाचा विचार कर असा सल्ला दिला आणि जर मुलगा झाला तर त्याचं नाव रोशन ठेव असंही सांगायला त्या विसरल्या नाही. तो जगभरात तुझं नाव रोशन करेल, असेही त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या,''माझी पाच मुलं आहेत आणि मी आता नातवंडांसह वेळ घालवते.'' त्यावर हीच योग्य वेळ असल्याचे, धोनी म्हणाला. त्यावर धोनीनं विचारलं की तुझी किती मुलं आहेत? त्यावर धोनीनं एक असं उत्तर दिलं. तिनं पुढं विचारलं की मुलगा आहे का? त्यावर धोनीनं मुलगी असं सांगितलं.  त्यावर आजीबाई म्हणाल्या, आता तुला मुलगा होईल आणि त्याचं नाव रोशन ठेव. तो तुझं नाव रोशन करेल. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे.  

पाहा व्हिडीओ...


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral Video An elderly woman advised MS Dhoni to keep the name of his son 'Roshan' if he ever has one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.