Video : विराट कोहलीनं दिलेलं 'Bat Balance' चॅलेंज अनुष्का शर्मानं केलं पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 04:56 PM2021-07-02T16:56:37+5:302021-07-02T16:57:06+5:30

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॅट बॅलेंस चॅलेंज दिले होते.

Video - Virat Kohli and Anushka Sharma take the 'Bat Balance' challenge | Video : विराट कोहलीनं दिलेलं 'Bat Balance' चॅलेंज अनुष्का शर्मानं केलं पूर्ण!

Video : विराट कोहलीनं दिलेलं 'Bat Balance' चॅलेंज अनुष्का शर्मानं केलं पूर्ण!

Next

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बॅट बॅलेंस चॅलेंज दिले होते. विराटनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो  दोन बोटांवर बॅट बॅलेंस करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आणि भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल यानं ते पूर्ण केलं. आता विराटची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनंही हे चॅलेंज पूर्ण करत व्हिडीओ पोस्ट केला आहे.इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी किमान दोन सराव सामने खेळू देण्याची बीसीसीआयची विनंती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने गुरुवारी मान्य केली. मालिका सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू आता डरहम येथे सराव करतील. त्याचवेळी काऊंटी संघांविरुद्ध क्रमश: चार आणि तीन दिवसांचे दोन सराव सामने चेस्टर ली स्ट्रीट मैदानावर आयोजित केले जातील.

कर्णधार विराट कोहली याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेआधी काऊंटी संघांविरुद्ध सराव सामने खेळायला मळावेत, अशी मागणी केली होती.  बीसीसीआयने कोहलीचा विचार ध्यानात घेत ईसीबीकडे सराव सामने खेळविण्याची विनंती केली. ईसीबीने ती लगेचच स्वीकारली.

Web Title: Video - Virat Kohli and Anushka Sharma take the 'Bat Balance' challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app