Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच आठवतोय, तसाच कॅच 'या' खेळाडूनं टिपला

इंग्लंडने यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. अंतिम सामन्यात विवादास्पद नियमाच्या आधारे त्यांनी न्यूझीलंडवर विजय मिळवून प्रथमच वन डे वर्ल्ड कप जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 09:05 PM2019-10-30T21:05:22+5:302019-10-30T21:05:38+5:30

whatsapp join usJoin us
Video : UAE's Rameez Shahzad take mind blowing catch like England Ben stoke did in ICC world Cup 2019 | Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच आठवतोय, तसाच कॅच 'या' खेळाडूनं टिपला

Video : बेन स्टोक्सचा अफलातून कॅच आठवतोय, तसाच कॅच 'या' खेळाडूनं टिपला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडने यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. अंतिम सामन्यात विवादास्पद नियमाच्या आधारे त्यांनी न्यूझीलंडवर विजय मिळवून प्रथमच वन डे वर्ल्ड कप जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने प्रतिस्पर्धींची दैना उडवली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर स्टोक्सने सर्वांना अचंबित करतील अशी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत त्यानं टिपलेला झेल स्पर्धेतील अफलातून झेल ठरला होता. तसा झेल कुणी घेणे नाही, असा आजपर्यंत सर्वांचा समज होता. पण, आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत असाच झेल टिपण्यात आला. संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड यांच्यातील लढतीत हा झेल टिपला गेला.


स्कॉटलंड संघाने बुधवारी  ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत संयुक्त अरब अमिरातीवर दणदणीत विजय मिळवला. स्कॉटलंडच्या 6 बाद 198 धावांचा पाठलाग करताना यूएईचा संघ 18.3 षटकांत 108 धावांत माघारी परतला. त्यांनी 90 धावांनी सामना जिंकला आणि स्कॉटलंडचा हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील दुसरा मोठा विजय ठरला. जॉर्ज मुन्सी आणि रिची बेरिंग्टन यांच्या फटकेबाजीनं स्कॉटलंडला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे तिकीट मिळवून दिले.

जॉर्ज मुन्सी आणि कर्णधार कायले कोएत्झर यांनी स्कॉटलंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावा जोडल्या. कोएत्झर 33 चेंडूंत 4 चौकारांसह 34 धावांत माघारी परतला. त्यानंतर आलेला मिचेल लिस्क ( 12) फार कमाल करू शकला नाही. पण, रिची बेरिंग्टनने दमदार खेळ केला. दरम्यान मुन्सीनं 43 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकारांसह 65 धावा केल्या. बेरिंग्टनने 18 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 48 धावा चोपल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर स्कॉटलंडने 6 बाद 198 धावा केल्या. यूएईच्या रोहन मुस्तफाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

मुन्सीला अहमद रझानं बाद केलं. रमीझ शहजाद याने त्याचा झेल टिपला आणि रमीझनं टिपलेला हा झेल पाहून सर्वांना स्टोक्सच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील झेलची आठवण झाली.

पाहा व्हिडीओ...

 

प्रत्युत्तरात यूएईला 12 धावांत सलामीवीर गमवावे लागले. रमीझ शहजाद ( 34) आणि मुहम्मद उस्मान ( 20) हे वगळता अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. यूएईच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. स्कॉटलंडच्या साफयान शरीफ आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. 

 

Web Title: Video : UAE's Rameez Shahzad take mind blowing catch like England Ben stoke did in ICC world Cup 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.