Video: Rohit Sharma cried for three days; Hitman told Emotional moment | ...म्हणून रोहित शर्मा तीन दिवस रडला होता; हिटमॅननं सांगितला Emotional किस्सा

...म्हणून रोहित शर्मा तीन दिवस रडला होता; हिटमॅननं सांगितला Emotional किस्सा

भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेत सपाटून मार खावा लागला. ट्वेंटी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवल्यानंतर वन डे मालिकेत झालेल्या हाराकिरीवर टीका होत आहे. वन डे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माला दुखापत झाली आणि त्याला न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. त्यानंतर रोहित आता मायदेशात परतला आहे आणि आता तो कुटुंबीयांना वेळ देत आहे. दुखापतीवर उपचार घेत रोहित पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा ( वन डे मालिका) सामना करणार आहे. त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) थरार रंगणार आहे. या सर्व आव्हानांसाठी रोहित सज्ज होत आहे. 

न्यूझीलंड दौऱ्यातून माघारी परतल्यामुळे रोहितला कसोटी मालिका खेळता येणार नाही. त्याच्या जागी संघात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित प्रथमच सलामीला आला होता. कसोटीत प्रथम ओपनिंग करताना रोहितनं दमदार फटकेबाजी केली आणि पहिल्याच सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी साकारली. त्यानंतर त्यानं रांची येथील कसोटी सामन्यात द्विशतक झळकावलं. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्घच्या कसोटी मालिकेत त्याच्या सलामीची सर्वांना उत्सुकता होती, परंतु त्याला माघार घ्यावी लागली. आता तो आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेतुन पुनरागमन करेल. पण, आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता रोहितला आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. 


क्रिकेटपासून सध्या दूर असलेल्या रोहितनं टीव्ही सेलिब्रेटी तारा शर्माला एक मुलाखत दिली. त्यात त्यानं आपल्या आयुष्यातील प्रवास उलगडला. त्यानं दिलेल्या मुलाखतीत एक प्रसंग सांगितला की त्यामुळे तो सलग तीन दिवस रडत होता. तो म्हणाला,''लहान असताना मी क्रिकेट हिवाळी शिबीर जाऊन पाहत होतो. तेव्हा मी मित्रांना सांगायचो की एक दिवस मीही येथे खेळेन. मला क्रिकेट आवडतो... 11 वर्षांचा असताना मला हिवाळी शिबिरात प्रवेश घेता आला. त्यासाठी माझ्या कुटुंबीयांनीही बरेच कष्ट घेतले. त्यावर्षी आमचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता आणि तेथे दिनेश लाड सरांनी माझा खेळ पाहिला. आम्ही अंतिम सामन्यात लाड सरांच्या सरांविरुद्ध खेळलो होतो. तो आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. मला शाळा बदलावी लागली होती. एकिकडे क्रिकेट खेळायला मिळेल याचा आनंद होता, तर दुसरीकडे मित्रांपासून दूर जाण्याचं दुःख होतं. त्यामुळे मी तीन दिवस रडलो होतो.''

तो पुढे म्हणाला,''तेव्हा मला त्या त्यागाचं महत्त्व समजत नव्हतो. पण, एकेक स्पर्धा जिंकत गेलो, सातत्यपूर्ण खेळ करत गेलो, तेव्हा महत्त्व समजलं. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहता येत नव्हतं. पण, आता मी कुटुंबीयांना पुरेसा वेळ दोतो. जेवढं शक्य होईल, तेवढा वेळ मी आता कुटुंबीयांना देतो.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कर्णधाराचा नव्हता आधार, म्हणून झटक्यात गायब झाले टीम इंडियाचे 'हे' शिलेदार!

IPL 2020 : RCB च्या परस्पर निर्णयावर कर्णधार विराट कोहली नाराज? युजवेंद्र चहलनंही विचारला सवाल

Video : 3 विकेट्स, 5 धावा! आफ्रिकेनं अखेरच्या षटकात इंग्लंडवर मिळवला थरारक विजय

अबब! १९२ कोटींचा घटस्फोट? ७ वर्षांच्या संसारानंतर दिग्गज खेळाडूनं घेतला काडीमोड

Web Title: Video: Rohit Sharma cried for three days; Hitman told Emotional moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.