Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडतात तेव्हा वातावरणात आपोआप तणाव निर्माण होतेच. दोन्ही देशांतील ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:50 PM2020-02-07T12:50:52+5:302020-02-07T12:51:23+5:30

whatsapp join usJoin us
Video : On This Day in 1999; When Anil Kumble take 'perfect ten' against Pakistan at Feroz Shah Kotla | Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...

Video : 'जम्बो' Anil Kumbleनं जेव्हा पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडतात तेव्हा वातावरणात आपोआप तणाव निर्माण होतेच. दोन्ही देशांतील राजकीय संबंध आणि क्रिकेटप्रती असलेलं वेड पाहता, कोणत्याही फॉरमॅटमध्ये दोन संघ भिडतात तेव्हा स्टेडियममधील वातावरण पाहण्यासारखं असतं. पण, सध्या चाहत्यांमधला तो कट्टरपणा किंचितसा कमी झालेला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटपटूही भावना बाजूला ठेवून व्यावसायिक क्रिकेट खेळण्यावरच भर देत आहेत. पण, एक काळ असा होता की मैदानाबाहेर टशन प्रत्यक्ष सामन्यात खेळाडूंमध्येही दिसायचे. दोन्ही संघ केवळ ११ खेळाडूंसह नव्हे तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले आपले पाठीराखे घेऊनच मैदानावर उतरलेत की काय असं वाटायचं... त्याच काळात भारताचा महान फिरकीपटू अनील कुंबळेनं पाकिस्ताच्या संपूर्ण संघाला पाणी पाजलं होतं.

आजच्याच दिवशी पण १९९९ साली फिरोज शाह कोटला स्टेडियवर 'जम्बो' कुंबळेनं इतिहास घडवला होता. इंग्लंडच्या जीम लेकर यांच्यानंतर कसोटी सामन्याच्या एका डावात दहा विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता. कुंबळेच्या या अविश्वसनीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. 


चेन्नई कसोटीत १२ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोटला कसोटीत प्रथम फलंदाजी करताना सदगोपन रमेश ( ६०) आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( ६७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं २५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव १७२ धावांवर गडगडला. गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीनं भारताला पहिल्या डावात ८० धावांची आघाडी मिळवून दिली.  त्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ केला. सदगोपन रमेश (९६) आणि सौरव गांगुली (६२) यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यांना जवागल श्रीनाथनं ४९ धावा करून चांगली साथ दिली आणि भारतानं दुसऱ्या डावात ३३९ धावा केल्या. 

भारतानं पाकिस्तासमोर ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. पण, पाकिस्तानचा सईस अन्वर ( ६९) आणि शाहिद आफ्रिदी ( ४१) यांनी भारताच्या मार्गात अडथळा निर्माण केला होता. चौथ्या दिवसाच्या उपहारापर्यंत कुंबळेनं सहा षटकं टाकली होती. 

कुंबळेचा सेकंड स्पेल...
उपहारानंतर कुंबळेनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं आफ्रिदीला यष्टिरक्षक नयन मोंगियाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्ताच्या डावाची पडझड सुरू झाली. त्यांचे पाच फलंदाज पुढील २७ धावांत माघारी परतले. इजाझ अहमद ( ०), इंजमाल-उल-हक ( ६) यांना कुंबळेनं झटपट माघारी पाठवले.  पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद युसूफलाही भोपळाही फोडू न देता कुंबळेनं माघारी पाठवले. मोईन खान २० चेंडूंत ३ धावा करून माघारी परतला. त्यानंतर सलामीवीर अन्वर ६९ धावांवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हाती झेल देऊन बाद झाला. पाकिस्तानची ६ बाद १२८ अशी दयनीय अवस्था झाली होती. 

सलीम मलिक ( १५) आणि वासीम अक्रम ( ३७) यांनी भारताचा विजय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, कुंबळेनं त्यांनाही बाद करून २६.३ षटकांत ७४ धावा देत पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. पाकिस्तानचे तीन फलंदाज भोपळाची फोडू शकले नाहीत, चौघांना एकेरी धाव करता आली. पाकिस्तानचा डाव २०७ धावांवर गडगडला. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दहा विकेट्स घेणारा कुंबळे हा पहिलाच भारतीय ठरला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारतानं कसोटी मालिकात १-१ अशी बरोबरीत सोडवली. 


पाहा व्हिडीओ

अनील कुंबळेची कारकीर्द
कसोटी - १३२ सामने, २५०६ धावा ( १/१००; ५/५०), ६१९ विकेट्स
वन डे - २७१ सामने, ९३८ धावा, ३३७ विकेट्स

IPL 2020 : राजस्थान रॉयल्स संघातील Jofra Archerची रिक्त जागा भरण्यासाठी तिघं शर्यतीत

Web Title: Video : On This Day in 1999; When Anil Kumble take 'perfect ten' against Pakistan at Feroz Shah Kotla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.