'This victory of Zimbabwe is a gift from Diwali' - Lalchand Rajput | ‘झिम्बाब्वेचा हा विजय म्हणजे दिवाळीची भेट’ - लालचंद राजपूत

‘झिम्बाब्वेचा हा विजय म्हणजे दिवाळीची भेट’ - लालचंद राजपूत

मुंबई - झिम्बाब्वे संघाला पाच वर्षांनंतर बांगलादेशविरुद्ध मंगळवारी मिळालेला विजय माझ्यासाठी दिवाळीची भेट आहे, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी दिली.
राजपूत म्हणाले,‘आमच्यासाठी हा महत्त्वाचा विजय आहे. कारण बलाढ्य संघांनाही बांगलादेशमध्ये संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे बांगलादेशला त्यांच्या भूमीत पराभूत करणे आमच्यासाठी मोठा विजय आहे.’
पाकिस्तानला २०१३ मध्ये हरारे येथे पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटी विजय आहे. झिम्बाब्वेने विदेशात १७ वर्षांनंतर कसोटी विजय साकारला. त्यांनी २००१ मध्ये चितगावमध्ये बांगलादेशला पराभूत केले होते.
५६ वर्षांचे भारतीय फलंदाज राजपूत म्हणाले, ‘मी खूप आनंदी असून माझ्यासाठी हा विजय दिवाळी गिफ्टप्रमाणे आहे. मला संघाला नव्याने गठित करावे लागले. सुरुवातीला काही सामन्यांतील पराभवानंतर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि तेथील नागरिकांसाठी हा शानदार निकाल आहे.’ यासह राजपूत यांनी विजयाचे श्रेय सर्व संघाला दिले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  'This victory of Zimbabwe is a gift from Diwali' - Lalchand Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.