वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास

वनडेत शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड, आता कसोटीत गोलंदाजी करताना पहिली विकेट घेतरचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:27 IST2025-07-14T17:24:27+5:302025-07-14T17:27:57+5:30

whatsapp join usJoin us
Vaibhav Suryavanshi Become Youngest Indian Bowler To Take Wicket In Youth Test Create History | वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास

वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इंग्लंड दौऱ्यातील १९ वर्षांखालील वनडे मालिकेत फलंदाजीत आपली धमक दाखवून दिली. पाच सामन्यांच्या मालिकेत ३५५ धावा करत तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा बॅटर ठरला. एवढेच नाही तर ५५ चेंडूतील शतकी खेळीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्डही सेट केला. आता कसोटीत त्याने गोलंदाजी करताना इतिहास रचला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

आता गोलंदाजीत पहिली विकेट घेत रचला इतिहास

वनडे मालिकेनंतर भारत अंडर १९ विरुद्ध इंग्लंड अंडर १९ संघात कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी सामन्यात वैभव सूर्यवंशी याने गोलंदाजी करताना एक विकेट घेतली. ही विकेट आपल्या खात्यात जमा करताच वैभव सूर्यवंशीच्या नावे खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक

 सर्वात युवा भारतीय गोलंदाज ठरला वैभव 

वैभव सूर्यंवंशीनं १९ वर्षांखालील इंग्लंड संघाचा कर्णधार हमजा शेख याच्या रुपात टेस्टमध्ये पहिली विकेट घेतली. यासह यूथ टेस्टमध्ये सर्वात कमी वयात विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. वैभव सूर्यवंशीनं १४ वर्षे १०७ दिवस वयात ही विकेट घेतली.

कॅप्टन आयुष म्हात्रेचं शतक; युवा टीम इंडियानं पहिल्या डावात ठोकल्या ५४० धावा

इंग्लड अंडर १९ संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ५४० धावा केल्या. भारताकडून आयुष म्हात्रेनं  १०२ धावांची खेळी केली. याशिवाय अभिज्ञान कुंडू याने ९० धावा तर राहुल कुमार याच्या भात्यातून ८५ धावांची खेळी पाहायला मिळाली.  २५१ धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. वैभव सूर्यवंशीनं ६ षटके गोलंदाजी करताना १० धावा खर्च करून एक विकेट घेतली.
 

Web Title: Vaibhav Suryavanshi Become Youngest Indian Bowler To Take Wicket In Youth Test Create History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.