ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 09:39 PM2021-09-14T21:39:49+5:302021-09-14T21:39:54+5:30

घोडबंदर रोड परिसरातील पातलीपाडा भागातील श्री माँ विद्यालयाच्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड

two girls from thane selected for mumbai Under 19 cricket team | ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

ठाण्यातील दोघींची मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

Next

ठाणे- राजकोट येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील एक दिवसीय मालिकेसाठी मुंबई क्रिकेट महिला संघात ठाण्याच्या श्री माँ शाळेतील महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची निवड करण्यात आली आहे. महेकची संघात निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. निवड समितीने या संघाच्या खेळाडूंच्या यादीची मुंबईमध्ये अधिकृत घोषणा केली.   

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या महिला अंडर-19 निवड समितीमध्ये संगिता कटवारे (चेअरवुमन), अपर्णा चव्हाण, सुषमा माधवी, शीतल सकरू आणि श्रद्धा चव्हाण यांचा समावेश आहे. महिला एकदिवसीय लीग सामने 28 सप्टेंबर 2021 पासून राजकोट येथे खेळवले जाणार आहेत. यासाठी २२ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

श्री माँ शाळेत शिकणाऱ्या महेक पोकर आणि प्रज्ञा भगत यांची संघात निवड करण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. महेक ही उत्तम यष्टिरक्षक असून एक चांगली फलंदाज आहे. तर प्रज्ञा भगतही डावखुरी मध्यम गतीची गोलंदाज आहे. क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रतीश भोईर आणि जयेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली दोघी क्रिकेटचे धडे घेत आहेत. या दोघींच्या फिटनेसची ट्रेनिंग फिटनेस कोच अजित कुलकर्णी घेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: two girls from thane selected for mumbai Under 19 cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app