'This' thing happened with Mahendra Singh Dhoni at Kolkata airport, he did not even allow to take baggage | कोलकाता एअरपोर्टवर महेंद्रसिंग धोनीबरोबर झाली 'ही' गोष्ट, सामानालाही हात लावू दिला नाही
कोलकाता एअरपोर्टवर महेंद्रसिंग धोनीबरोबर झाली 'ही' गोष्ट, सामानालाही हात लावू दिला नाही

कोलकाता : कोणाबरोबर कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेच उदाहरण घ्या ना. कोलकाता एअरपोर्टवर धोनीबरोबर अशी एक घटना घडली की, त्याला आपल्या सामानालाही हात लावायला दिले नाही.

धोनी के साथ कोलकाता एयरपोर्ट पर हुई ये घटना, एयरलाइंस ने मानी गलती

धोनी एका खासगी कामासाठी दिल्लीहून कोलकाता येथे जात होता. धोनी दिल्लीहून कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरला. त्यानंतर धोनी आपले सामान घेण्यासाठी सरसावला. पण यावेळी धोनीला सामानाला हात लावू दिले नाही.

धोनी के साथ कोलकाता एयरपोर्ट पर हुई ये घटना, एयरलाइंस ने मानी गलती

धोनी सामान घेण्यासाठी उभा होता. त्यावेळी आपली वाटणारी एक बॅग धोनीने उचलली. पण यावेळी एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी धोनीला ही बॅग घेऊन जायला दिली नाही. कारण धोनीसारखीच बॅग एका प्रवाशाची होती. तो प्रवासी धोनीची बॅग घेऊन निघाला होता. त्यामुळे जेव्हा ही गोष्ट कर्मचाऱ्यांना समजले तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला. यासाठी धोनीला काही काळ एअरपोर्टवर थांबून रहावे लागले, असे समजते.
 

Web Title: 'This' thing happened with Mahendra Singh Dhoni at Kolkata airport, he did not even allow to take baggage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.