There will be a big change in the Indian cricket team | भारतीय क्रिकेट संघात होणार आता मोठा बदल

भारतीय क्रिकेट संघात होणार आता मोठा बदल

मुंबई : भारताच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची उचलबांगडी होणार असल्याचे दिसत आहे. कारण निवड समितीने याबाबत काही संकेत दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगर यांना निवड समितीने काही प्रश्न विचारले. या प्रश्नावर बांगर यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे बांगर यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. आता रवी शास्त्री यांची डोकेदुखी वाढणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत तरी कोण, आता तिघांमध्येच चुरस
भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. पण अजूनपर्यंत सहाय्यक प्रशिक्षकांची निवड करण्यात आलेली नाही. पण निवड समितीने मात्र या प्रत्येक पदासाठी तीन जणांची निवड केली आहे. आता या तीन जणांमध्येच चुरस असेल.

फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी संजय बांगर, विक्रम राठोड आणि मार्क रामप्रकाश यांच्यांमध्ये आता स्पर्धा असेल. गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी भारत अरुण, पारस म्हाब्रे आणि वेंकटेश प्रसाद यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर, अभय शर्मा आणि टी. दिलीप यांच्यांमधून निवडण्यात येईल.

Web Title: There will be a big change in the Indian cricket team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.