T20 world cup, IND vs PAK : ‘Mauka Mauka’ पुन्हा आला तेही पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी Bye 1 Break 1 Free ऑफर घेऊन, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 10:16 PM2021-10-13T22:16:27+5:302021-10-13T22:17:30+5:30

T20 World Cup, India vs Pakistan : भारत - पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांसाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं आणलेल्या मौका मौका जाहीरातीनं सर्वांना वेड लावलं होतं.

T20 World Cup, India vs Pakistan : ‘Mauka Mauka’ as Star Sports launches special teaser for India vs Pakistan, video | T20 world cup, IND vs PAK : ‘Mauka Mauka’ पुन्हा आला तेही पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी Bye 1 Break 1 Free ऑफर घेऊन, Video

T20 world cup, IND vs PAK : ‘Mauka Mauka’ पुन्हा आला तेही पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी Bye 1 Break 1 Free ऑफर घेऊन, Video

Next

T20 World Cup, India vs Pakistan : भारत - पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेट सामन्यांसाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं आणलेल्या मौका मौका जाहीरातीनं सर्वांना वेड लावलं होतं. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. त्यामुळे Star Sportsनं पुन्हा एकदा ‘Mauka Mauka’ ची जाहीरात आणली आहे आणि  यावेळी त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांसाठी Bye 1 Break 1 Free ऑफर ठेवली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत-पाकिस्तान पाच वेळा भिडले आणि पाचही वेळेस भारतानं बाजी मारली. यावेळी पाकिस्तानचा संघ बाजी मारेल, असे दावे त्यांच्या आजी-माजी खेळाडूंकडून केले जात आहेत.

आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ ७ वेळा भिडले, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा भिडले आणि भारतानेच बाजी मारली. चॅम्पियन्स ट्रॉफीत मात्र ५ पैकी २ सामने भारतानं जिकंल, तर तीनमध्ये पाकिस्ताननं बाजी मारली आहे. आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांतील जय-पराजयाची आकडेवारी पाहता भारताचे पारडे १४-०३ असे जड आहे.  

Web Title: T20 World Cup, India vs Pakistan : ‘Mauka Mauka’ as Star Sports launches special teaser for India vs Pakistan, video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app