T10 League : Abdul Shakoor’s slams 14 ball 50 to secure Maratha Arabians win over Northern Warriors | T10 League : अब्दुल शकूरचा कहर; चोपलं १४ चेंडूंत अर्धशतक, मराठा अरेबियन्सला मिळवून दिला एकहाती विजय

T10 League : अब्दुल शकूरचा कहर; चोपलं १४ चेंडूंत अर्धशतक, मराठा अरेबियन्सला मिळवून दिला एकहाती विजय

अबु धाबी टी10 लीगला ( Abu Dhabi T10 League) गुरुवारपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात संयुक्त अरब अमिरातीच्या फलंदाजानं तगड्या गोलंदाजांचा चुराडा केला. मराठा अरेबियन्स ( MARATHA ARABIANS ) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अब्दुल शकूर ( Abdul Shakoor) यानं वेन पार्नेल, वाहब रियाझ या अनुभवी गोलंदाजांना धु धु धुतले. त्यानं २८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७३ धावांची स्फोटक खेळी केली. त्यानं १४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या फटकेबाजीनं मराठा अरेबियन्सनं ५ विकेट्स राखून नॉर्दन वॉरियर्सचा पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्सनं १० षटकांत २ बाद १२७ धावा केल्या. लेंडल सिमन्सनं ३१ चेंडूंत ७ चौकार  व १ षटकार खेचून नाबाद ५४ धावा केल्या. ब्रेंडन किंग ( २९), निकोलस पूरन ( १९) आणि रोव्हमन पॉवेल ( २२) यांनीही तुफान खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना अरेबियन्सनचे फलंदाज माघारी परतत असताना अब्दुल शकूरने एका बाजूनं खिंड लढवली आणि संघाला ५ बाद १३१ धावा करून देताना विजय निश्चित केला. 


 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: T10 League : Abdul Shakoor’s slams 14 ball 50 to secure Maratha Arabians win over Northern Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.