Super Kings will change Dhoni's batting order | सुपर किंग्स धोनीचा फलंदाजी क्रम बदलणार

सुपर किंग्स धोनीचा फलंदाजी क्रम बदलणार


दुबई : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपल्या तिसऱ्या लढतीपूर्वी फलंदाजी क्रमामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या स्थानाबाबत विचारमंथन करेल.
शारजाहमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने सॅम कुरेन, जाधव व रुतुराज गायकवाड यांना आपल्यापूर्वी फलंदाजीची संधी दिली, पण ही रणनीती सपशेल अपयशी ठरली.
दिल्ली हर्षल पटेलला संधी देऊ शकते. पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमेयर, शिखर धवन, रिषभ पंत, कर्णधार श्रेयस, मार्कस स्टोइनिस यांच्यासारखे बिग हिटर संघात आहेत.

रायुडूची अनुपस्थिती
चेन्नईचा ‘मॅच विनर’ अंबाती रायुडू या लढतीला मुकणार आहे. सीएसके संघव्यवस्थापनाने रायुडू या लढतीत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. सीएसकेच्या सीईओंनी रायुडूची दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. रायुडूला स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवत आहे, पण तो आणखी एका सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे.
दिल्ली कॅपिटल्ससाठी जर रविचंद्रन अश्विन खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर सीनिअर स्पिनर अमित मिश्रा अक्षर पटेलचा साथीदार म्हणून पर्याय ठरू शकतो.
वेदर रिपोर्ट । दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश राहील. दिवसाचे तापमान ३९ डिग्री सेल्सियसच्या जवळपास राहण्याची शक्यता. वाºयाचा वेग २३ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.
पिच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीपटूंंना अनुकूल राहील. त्यात दोन्ही संघांचे फिरकीपटू वर्चस्व गाजवण्याची शक्यता.
मजबूत बाजू

चेन्नई । डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावा फटकावण्यास माहीर फलंदाज. रवींद्र जडेजा, लुंगी एनगिडी, पीयूष चावला कुठल्याही खेळपट्टीवर फलंदाजांना रोखण्यात सक्षम आहेत.
दिल्ली । विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. स्टोईनिसचा फॉर्म संघासाठी जमेची बाजू. रबादासारख्या गोलंदाजाची उपस्थिती.
कमजोर बाजू
चेन्नई । गेल्या लढतीत धोनीला वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळ करता आला नाही. मुरली विजय, केदार जाधव फॉर्मात नाहीत. फाफ ड्यूप्लेसिसवर अधिक दडपण राहील.
दिल्ली। मोहित शर्माची सुमार कामगिरी. विशेषत: जॉर्डनला सांभाळणे आवश्यक. त्याने गेल्या लढतीत ४ षटकांत ५६ धावा बहाल केल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Super Kings will change Dhoni's batting order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.