SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी

आज उभय संघादरम्यान लढत होणार असून सनरायर्स हैदराबादला आज विजय मिळवून सुरुवातीच्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. 

By मुकेश चव्हाण | Published: October 22, 2020 07:14 PM2020-10-22T19:14:47+5:302020-10-22T19:20:08+5:30

whatsapp join usJoin us
SRH vs RR Latest News :Sunrisers Hyderabad win the toss and elect to field  | SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी

SRH vs RR Latest News: हैदराबादचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विलियम्सनच्या जागी तगड्या अष्टपैलूला संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : राजस्थान रॉयल्स  (Rajasthan Royals) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघांपुढे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे.  सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हैदराबादने संघात दोन बदल केले असून केन विलियम्सनच्या जागी जेसन होल्डरला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज थंपीच्या जागी शाहबाज नदीमला पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजस्थानने मात्र संघात कोणतेही बदल केले नाही. 

आज उभय संघादरम्यान लढत होणार असून सनरायर्स हैदराबादला आज विजय मिळवून सुरुवातीच्या सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. 

राजस्थानने १० पैकी चार तर हैदराबादने ९ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान सहाव्या तर हैदराबाद सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघासाठी आज होणारा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. 

राजस्थान रॉयल्सचा संघः जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, रियान पराग, राहुल टेवाटिया, श्रेयस गोपाळ, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी

सनरायझर्स हैदराबादः डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, जेसन होल्डर, प्रियाम गर्ग, विजय शंकर, अब्दुल समद, रशीद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम, संदीप शर्मा 

Web Title: SRH vs RR Latest News :Sunrisers Hyderabad win the toss and elect to field 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.