... so get ready to play in the IPL this year | ...तर यंदा आयपीएल खेळण्याची तयारी

...तर यंदा आयपीएल खेळण्याची तयारी

सिडनी : कोरोनामुळे आगामी आॅक्टोबरमध्ये आयोजित टी२० विश्वचषक स्थगित झाल्यास यंदाच्या वर्षी आयपीएल खेळण्यास आपण सज्ज आहोत, असे आॅस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने सोमवारी सांगितले. बीसीसीआयने आॅक्टोबरमध्ये आयपीएल आयोजनाची शक्यता वर्तविली आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेला स्मिथ आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या सरकारकडून परवानगी मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहे.


स्मिथ म्हणाला, ‘देशासाठी विश्वचषक खेळण्यापेक्षा मोठे काहीही नाही. मी विश्वचषकाला पसंती दर्शवेन, मात्र आमच्या हातात काहीच नाही. आम्हाला जे सांगितले जात आहे, ते करीत आहोत.’ क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेकडे टी२० विश्वचषकाचे आयोजन २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्याची विनंती केल्याचे वृत्त असून या संदर्भात अंतिम निर्णय १० जून रोजी होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत अपेक्षित असेल. स्मिथ पुढे म्हणाला, ‘आम्ही व्यावसायिक खेळाडू अशा वृत्तांवर अधिक विसंबून न राहता सरकारच्या निर्देशांवर चालतो. सध्या जगाची स्थिती वाईट असून क्रिकेट अप्रासंगिक झाले आहे. योग्य वेळ येताच आम्ही मैदानावर पुनरागमन करू. तोपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे गरजेचे आहे.’ आॅस्ट्रेलियात क्रिकेट ९ आॅगस्टपासून सुरू होणार
आहे. (वृत्तसंस्था)

दिवस-रात्र कसोटीचा लाभ आॅस्ट्रेलियाला
भारताच्या तुलनेत गुलाबी चेंडूने अधिक कसोटी खेळण्याचा अनुभव आम्हाला असल्याने डिसेंबरमध्ये उभय देशात होणाºया दिवस-रात्र कसोटीचा लाभ आॅस्ट्रेलियालाच होईल, असे स्टीव्ह स्मिथ याला वाटते. अ‍ॅडिलेड येथे ११ डिसेंबरपासून दिवस-रात्र दुसरी कसोटी खेळली जाईल. भारताने कोलकाता येथे जो सामना खेळला त्यावेळी स्थिती वेगळी होती. ब्रिस्बेनच्या खेळपट्टीवर आमचा रेकॉर्ड उत्तम आहे. हे मैदान आमच्यासाठी फारच ‘लकी’ असल्याचे स्मिथने सांगितले.


कोरोना ब्रेक उपयुक्त ठरला
आॅस्ट्रेलियाचे दिग्गज स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क यांनी सोमवारी सिडनीच्या आॅलिम्पिक पार्कमध्ये सरावास सुरुवात केली. दोन महिने फलंदाजीपासून दूर राहिलेल्या स्मिथने अद्यापही बॅटला हात लावलेला नाही. या काळात त्याने शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी फिटनसेवर लक्ष दिले. २०१९च्या व्यस्त वेळापत्रकामुळे कोरोना ब्रेक आमच्यासाठी उपयुक्त ठरल्याचे सांगून स्मिथ म्हणाला, ‘घरच्या घरी राहून मी चाहत्यांसोबत आॅनलाईन चर्चा केली, मात्र बॅटला कधीही हात लावलेला नाही.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ... so get ready to play in the IPL this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.