पहिली अ‍ॅशेस कसोटी: स्मिथचे सलग दुसरे शतक, कांगारू भक्कम स्थितीत

इंग्लंडविरुद्ध दोन्ही डावांत शतके झळकाविणारा पाचवा ऑस्ट्रेलियन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 02:27 AM2019-08-05T02:27:50+5:302019-08-05T02:28:08+5:30

whatsapp join usJoin us
Smith's second consecutive century, Kangaroo in strong condition | पहिली अ‍ॅशेस कसोटी: स्मिथचे सलग दुसरे शतक, कांगारू भक्कम स्थितीत

पहिली अ‍ॅशेस कसोटी: स्मिथचे सलग दुसरे शतक, कांगारू भक्कम स्थितीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्मिंगहॅम : सुमारे एका वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळत असलेल्या स्टीव्ह स्मिथने कारकिर्दीत पहिल्यांदाच दोन्ही डावांमध्ये झळकावलेल्या शतकांच्या जोरावर अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत पोहचला आहे. रविवारी दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारूंनी ७ बाद ४८७ धावांवर डाव घोषित केला होता. तर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनाबाद १३ धावा केल्या होत्या.

पहिल्या डावात १४४ धावांची सुंदर खेळी साकारणाºया स्थिमने दुसºया डावातही अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने २०७ चेंडूंत १४ चौकारांसह १४२ धावा केल्या. त्याला मोलाची साथ देणाºया मॅथ्यू वेड यानेही शतक झळकावले. पहिल्या डावात ९० धावांनी माघारूनदेखील स्मिथ-वेड यांनी दुसºया डावात पाचव्या गड्यासाठी केलेल्या १२६ धावांच्या भागिदारीमुळे कांगारू सामन्यात परतले. वेड याने ११० धावा केल्या.

आॅस्ट्रेलियाकडे आता ३८४ धावांची आघाडी झाली आहे. भरवशाचा गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापग्रस्त झाल्याने त्याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांना चौथ्या दिवशी बळी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. अ‍ॅशेस मालिकेत कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकाविणारा स्मिथ हा पाचवा आॅस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. वॉरेन बार्डस्ले (१९०९), आॅर्थर मॉरिस (१९४६-४७), स्टीव्ह वॉ (१९९७) आणि मॅथ्यू हेडन (२००२-०३) यांनी हा पराक्रम केला आहे.

अ‍ॅशेसमधील दहावे शतक !
स्मिथच्या कारकिर्दीतील २५ शतकांपैकी १० शतके ही अ‍ॅशेस मालिकेतील आहेत. स्मिथने २४ अ‍ॅशेस लढतींतील ४३ डावांत ६०.८४च्या प्रभावी सरासरीने २ हजार ३१२ धावा फटकावल्या आहेत. यात १० शतकांचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव : २८४. इंग्लंड : पहिला डाव : ३७४.
आॅस्ट्रेलिया : दुसरा डाव : ९६ षटकांत ७ बाद ४८७ (स्टीव्ह स्मिथ १४२, मॅथ्यू वेड ११०, ट्रॅव्हिस हेड ५१, उस्मान ख्वाजा ४०, टीम पेन खेळत आहे ३४, बेन स्टोक्स ५/८५, ख्रिस वोेक्स १/४६, स्टुअर्ट ब्रॉड १/९१, मोईन अली २/१३०).
इंग्लंड दुसरा डाव : ७ षटकांत बिनाबाद १३ धावा (रोरी बर्न्स खेळत आहे ७, जेसन रॉय खेळत आहे ६)

Web Title: Smith's second consecutive century, Kangaroo in strong condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.