ठळक मुद्दे72 तासांत सहा जण झाली निगेटिव्ह, चौकांचे अहवाल पॉझिटिव्हचपाकिस्तान क्रिकेट मंडळाचा सावळागोंधळ सुरूच
पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) सध्या त्यांच्याकडून झालेल्या कोरोना चाचणीवरून चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पीसीबीनं खेळाडूंची कोरोना चाचणी केली. त्यात 29 पैकी 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पीसीबीनं जाहीर केलं. पण, आता शनिवारी पुन्हा एकदा अंतिम अहवाल जाहीर करताना पीसीबीचा सावळागोंधळ दिसून आला. आधी जाहीर केलेल्या 10 खेळाडूंपैकी सहा जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्यानं या वादाला तोंड फोडले, तो मोहम्मद हाफिजलाही कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय क्रिकेटमध्ये नेपोटिझम?; अर्जुन तेंडुलकरला टीम इंडियात मिळेल का सहज संधी?, आकाश चोप्रा म्हणतो...
पीसीबीनं कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची नावं मंगळवारी जाहीर केली होती. त्यानंतर मोहम्मद हाफिजनं खासगी केंद्रात पुन्हा चाचणी केली आणि तेथे त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे पीसीबी तोंडावर आपटले. हाफिजच्या बंडानंतर पीसीबीनं पुन्हा खेळाडूंची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हाफिजसह सहा खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. पण, खेळाडूंचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत या सहा खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर जाता येणार नाही. त्यांची पुन्हा एकदा चाचणी होईल.
आधी पॉझिटिव्ह आणि आता निगेटिव्ह खेळाडू - मोहम्मद हस्नैन, शाबाद खान, फाखर झमान, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हाफिज, वाहब रियाझ
पॉझिटिव्ह खेळाडू - काशीफ भट्टी, हॅरीस रौफ, हैदर अली आणि इम्रान खान
![]()
मालिकेचे वेळापत्रक
कसोटी
5-9 ऑगस्ट - ओल्ड ट्रॅफर्ड
13-17 ऑगस्ट - साऊदम्प्टन
21-25 ऑगस्ट - साऊदम्प्टन.
ट्वेंटी-20
29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर
अन्य महत्त्वाच्या बातम्या
हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!
पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही
Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...
प्यार वाली Love Story: रॉबिन उथप्पाला दोन वेळा करावं लागलं होतं लग्न!