Shocking! Anushka Sharma's cup of tea was lifted at the World Cup by selection committee members; Former cricketers revealed | धक्कादायक! विश्वचषकात अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते निवड समिती सदस्य; माजी क्रिकेटपटूंचा खुलासा
धक्कादायक! विश्वचषकात अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते निवड समिती सदस्य; माजी क्रिकेटपटूंचा खुलासा

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात निवड समितीमधील सदस्य हे कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत होते, असा धक्कादायक खुलासा भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी केला आहे. या निवड समितीला त्यांनी मिकी माऊस असे देखील म्हटले आहे.

Image result for anushka sharma with selection committee

सध्याच्या घडीला निवड समितीमध्ये एकही अनुभवी क्रिकेटपटू नाही. संपूर्ण निवड समितीमधील सदस्यांनी 15 कसोटी सामनेही खेळलेले नसतील. त्यामुळे या निवड समितीवर विराटचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्माच्या चहाचे कपदेखील ते विश्वचषकात उचलत असल्याचा खुलासा भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला आहे.

Image result for anushka sharma with selection committee

इंजिनिअर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना सांगितले की, " विश्वचषक पाहायला मी गेलो होतो. तिथे काही व्यक्ती अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते. या व्यक्ती कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण कालांतराने या व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य असल्याचे समजले."

ते पुढे म्हणाले की, " हा प्रकार निंदनीय असाच होता. पण जर असे प्रकार थांबवायचे असतील तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरसारखे खेळाडू निवड समितीमध्ये असायला हवे."

Web Title: Shocking! Anushka Sharma's cup of tea was lifted at the World Cup by selection committee members; Former cricketers revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.