Join us  

भारतात धोका असतानाही तिथे खेळायला गेलो; Shahid Afridi चं रोहितच्या INDvsPAK विधानावर मत 

परदेशात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणे अद्भुत असेल, असे स्पष्ट मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 6:19 PM

Open in App

India vs Pakistan यांच्यातल्या द्विदेशीय मालिकेची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. २०१२-१३ नंतर दोन्ही संघांमध्ये अशी मालिका झालेली नाही. उभय संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पण, परदेशात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत खेळणे अद्भुत असेल, असे स्पष्ट मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi ) याने मत मांडले आहे. 

कसोटी क्रिकेटच्या आरोग्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये परदेशात मालिका होणे फायदेशीर ठरेल का,  मायकेल वॉनच्या प्रश्नावर रोहित म्हणाला, "पाकिस्तान हा चांगला कसोटी संघ आहे, ज्यांच्याकडे मजबूत गोलंदाजीचा युनिट आहे. ज्यांचा सामना करण्यासाठी भारत उत्सुक असेल. "तो एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाजी लाइनअप आहे. त्यामुळे ही एक चांगली स्पर्धा असेल, खासकरून जर तुम्ही परदेशात खेळलात तर. ते खूप छान असेल." 

भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिकेवर स्पष्ट भूमिका व्यक्त करणारा रोहित हा भारतीय क्रिकेटमधील कदाचित पहिलाच मोठा खेळाडू असेल. भारताचा कसोटी कर्णधार या नात्याने तो आयसीसी टूर्नामेंटच्या व्यतिरिक्त पाकिस्तानविरुद्ध नियमितपणे खेळू इच्छितो का, या वॉनच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, "होय, मला आवडेल."

आफ्रिदीने रोहितच्या या विधानाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला, रोहित शर्मा हा क्रिकेटचा मोठा खेळाडू आहे. पाकिस्तानी क्रिकेटबद्दल त्याच्या विधानाचं मी कौतुक करतो. भारत-पाकिस्तान द्विदेशीय मालिका व्हायलाच हवी. आम्ही भारतात क्रिकेट खेळायला गेलो आहोत... तिथे आम्हाला जीवाचा धोका आहे, हे माहित असूनही आम्ही दौरा केला. शेजारी म्हणून आपल्याला एकमेकांविरुद्ध खेळायला हवं.    

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माशाहिद अफ्रिदी