सचिन तेंडुलकर हे मान्य करणार नाही, पण तो शोएब अख्तरला घाबरायचा; शाहिद आफ्रिदीचा दावा

यापूर्वी आफ्रिदीनं भारतीय खेळाडू पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची क्षमा मागायचे असा दावा त्यानं केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:33 PM2020-07-08T13:33:40+5:302020-07-08T13:34:50+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar won't admit but he was scared of facing Shoaib Akhtar, Saeed Ajmal: Shahid Afridi | सचिन तेंडुलकर हे मान्य करणार नाही, पण तो शोएब अख्तरला घाबरायचा; शाहिद आफ्रिदीचा दावा

सचिन तेंडुलकर हे मान्य करणार नाही, पण तो शोएब अख्तरला घाबरायचा; शाहिद आफ्रिदीचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशोएब अख्तरच्या गोलंदाजीवर सचिन तेंडुलकरचे पाय थरथरताना पाहिलेत, आफ्रिदीवर्ल्ड कप स्पर्धेत तेंडुलकर सईद अजमललाही घाबरला होता

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याची बेताल वक्तव्याची मालिका कायम आहे. काश्मीर मुद्द्यावरून भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या आफ्रिदीनं भारतीय क्रिकेटपटूंबद्दलही अनेकदा वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यात आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची भर पडली आहे. पाकिस्तानी पत्रकार झैनाब अब्बससोबत ( सौंदर्याच्या बाबतीत अनेकांवर भारी पडतेय क्रिकेटपटूची लेक; पाक खेळाडूंकडून मिळालेली वाईट वागणूक )चर्चा करताना आफ्रिदीनं सचिन तेंडुलकरबद्दल मोठं विधान केलं आहे. महान फलंदाज तेंडुलकर पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर आणि सईद अजमल यांचा सामना करण्यास घाबरायचा, असा दावा आफ्रिदीनं केला.

यापूर्वी आफ्रिदीनं भारतीय खेळाडू पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंची क्षमा मागायचे असा दावा त्यानं केला होता. 40 वर्षीय आफ्रिदीनं सवेरा पाशा या यू ट्यूब कार्यक्रमात विधान केलं की,''भारताविरुद्ध खेळण्याचा आम्ही नेहमी आनंद लुटला. आम्ही त्यांना अनेकदा पराभूत केलं आहे. आम्ही त्यांना एवढा वेळा हरवलं आहे की, सामन्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे क्षमा मागायचे.''  

आता त्यानं आपला मोर्चा तेंडुलकरकडे वळवला आहे. त्यानं म्हटलं की,''तो स्वतःच्या तोंडून हे सांगणार नाही की, त्याला भीती वाटायची. पण, शोएब अख्तरच्या काही चेंडूंवर तो घाबरला होता. तुम्ही मिडऑफ किंवा कव्हरवर क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला फलंदाजाच्या देहबोलीवरून त्याच्या मनात काय चाललंय, हे समजतं. त्यामुळे फलंदाज दबावात आहे, हे सहज समजतं. शोएब नेहमची तेंडुलकरला घाबरवायचा असं मला म्हणायचं नाही, परंतु त्याच्या काही स्पेलनं तेंडुलकरला बॅकफुटवर टाकले होते.''

''तेंडुलकर शोएबला घाबरायचा. मी हे स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे. मी स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करताना शोएब गोलंदाजीवर आल्यावर तेंडुलकरचे पाय थरथर कापताना मी पाहिलंय. वर्ल्ड कप स्पर्धेत सईद अजमल याच्या गोलंदाजीवरही तेंडुलकर घाबरलेला.  

तेंडुलकर vs अख्तर
तेंडुलकर आणि अख्तर यांचा 9 कसोटीत सामना झाला. तेंडुलकरनं त्याच्याविरुद्ध 41.60 च्या सरासरीनं 416 धावा केल्या आहेत, तर अख्तरनं 3 वेळा तेंडुलकरला बाद केलं आहे.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

64 वर्ष जुन्या महालात राहतो 'बंगाल टायगर'; पाहूया सौरव गांगुलीच्या महालाचे Unseen फोटो! 

भारतीय क्रिकेटपटूंचा अ‍ॅटिट्यूड बदलणाऱ्या सौरव गांगुलीला क्रीडा विश्वातून वाढदिवसाच्या शुभेच्छा 

वा माही, वा : महेंद्रसिंग धोनीचा जाहीरातींना नकार; नैसर्गिक खताचा ब्रँड तयार करणार!

'दादा'गिरी तो हम अंग्रेजों की धरती पर भी करेंगे...! 

Viral Video : MS Dhoni ला शुभेच्छा देण्यासाठी हार्दिक पांड्या पत्नीसह पोहोचला रांचीत

Web Title: Sachin Tendulkar won't admit but he was scared of facing Shoaib Akhtar, Saeed Ajmal: Shahid Afridi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.