SA vs PAK, 3rd T20I : South Africa is the first team in 7 years to score 200+ against Pakistan in T20Is; SA 5/203 | SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी

SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी

SA vs PAK, 3rd T20I : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं आजच आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले. पण, त्याचा हा आनंद फार काळ टीकला नाही. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना धु धु धुतलं... मागील ७ वर्षांत पाकिस्तानची अशी अवस्था कोणत्याच संघानं केली नव्हती आणि ती आज आफ्रिकेनं करून दाखवली. प्रथम फलंदाजी करताना जॅनेमन मलान, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व जॉर्ज लिंडे यांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर हात साफ केले. ७ वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२०त २००+ धावा करणारा आफ्रिका हा पहिलाच संघ ठरला. आफ्रिकेनं २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या. याआधी २०१३मध्ये डिसेंबरमध्ये श्रीलंकेनं २००+ धावा केल्या होत्या.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मलान व मार्कराम यांनी पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. मलान ४० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर, तर मार्कराम ३१ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावांवर माघारी परतला. ही दोघं माघारी परतल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजा कमबॅक करतील असे वाटत होते, परंतु लिंडे व ड्यूसेन यांनी हात साफ केले. लिंडेनं ११ चेंडूंत २२, तर ड्युसेननं २० चेंडूंत ३४ धावा कुटल्या. 

English summary :
South Africa is the first team in 7 years to score 200 against Pakistan in T20Is. Last was Sri Lanka in December 2013

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SA vs PAK, 3rd T20I : South Africa is the first team in 7 years to score 200+ against Pakistan in T20Is; SA 5/203

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.