S. Sreesanth's house caught fire | एस. श्रीसंतच्या घराला लागली आग; काच फोडून काढले बाहेर
एस. श्रीसंतच्या घराला लागली आग; काच फोडून काढले बाहेर

कोची : काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची बंदी उठलेला आणि आता भारतीय संघातील पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या एस. श्रीशांतच्या घरी आग लागल्याचे वृत्त आहे. यावेळी अग्निशमन दलाने काच फोडून श्रीसंतच्या कुटुंबियांना बाहेर काढले. 

कोची येथील इडापल्ली येथे श्रीसंतचे घर आहे. शुक्रवारी मध्यरात्री श्रीसंतच्या घराला आग लागली. यावेळी श्रीसंतची पत्नी, मुलं आणि घरी काम करणारी व्यक्ती होती. या सर्वांना अग्निशमन दलाने सर्वांना सुरक्षित घराबाहेर काढले. या आगीमध्ये एका रुममधील सर्व सामान भस्मसात झाले आहे.

आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण आता बीसीसीआयने त्याच्यावरील बंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यावरील आजीवन बंदी हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आता श्रीसंतवर फक्त सात वर्षांची बंदी असेल. त्यामुळे श्रीसंत कधी मैदानावर दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना आसेल.

श्रीसंतवर १३ सप्टेंबर २०१३ या दिवशी आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आता त्याच्यावर फक्त सात वर्षांच्या बंदीची शिक्षा असून ही बंदी सप्टेंबर २०२० मध्ये संपुष्टात येणार आहे. 

या निर्णयाबाबत श्रीसंत म्हणाला की, " आयुष्यात मी लिएंडर पेसला आदर्श मानत आलो आहे. पेस जर ४५ व्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळू शकतो, तर आशीष नेहरा ३८व्या वर्षी विश्वचषक खेळू शकतो. मी सध्याच्या घडीला ३६ वर्षांचा आहे आणि माझा सराव सुरु आहे. 

श्रीसंतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली होती. याप्रकरणी ३६ जणांना अटक केली होती. पण या ३६ पैकी एकाही व्यक्तीवर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रीसंतने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथील एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. 

श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीशांतने म्हटलं होतं.

Web Title: S. Sreesanth's house caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.