IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना ३ विकेट्सनं जिंकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 11:27 PM2021-04-15T23:27:24+5:302021-04-15T23:28:07+5:30

whatsapp join usJoin us
RR vs DC IPL 2021 Highlights Miller 62 Morris 36 power Royals to three wicket win over Capitals | IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू दिल्लीला पडला 'महागात'; राजस्थानचा दमदार विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, RR vs DD, Live: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना ३ विकेट्सनं जिंकला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानं दिलेलं १४८ धावांचं आव्हान राजस्थानच्या संघानं दोन चेंडू आणि तीन विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू ख्रिस मॉरिसनं १८ चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करुन दिला. यात ४ खणखणीत षटकारांचा समावेश आहे. मॉरिसनं या मॅच विनिंग खेळीसह आयपीएलच्या इतिहासातील त्याच्यावर लागलेली सर्वात मोठी बोली सिद्ध करुन दाखवली आहे. ख्रिस मॉरिसला यंदा लिलावात १६.२५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलं आहे. (RR vs DC IPL 2021 Highlights Miller 62 Morris 36 power Royals to three wicket win over Capitals)

दिल्लीच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली होती. जोस बटलर, मनन वोहरा, कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे स्वस्तात बाद झाले होते. अवघ्या ३६ धावांमध्ये राजस्थानने चार विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रियान पराग देखील अवघ्या दोन धावा करुन माघारी परतला होता. बेन स्टोक्सच्या जागी संघात संधी मिळालेल्या डेव्हिड मिलरनं संघाच्या धावसंख्येला सावरत ६२ धावांचं योगदान दिलं. मिलर बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया (१९) आणि अखेरीस ख्रिस मॉरिसनं सामन्यावरचा संपूर्ण दबाव नाहीसा करत संघाला विजय प्राप्त करुन दिला. 

दिल्लीचाही डाव डळमळला
दिल्लीकडून रिषभ पंतनं कर्णधारी कामगिरी बजावत ३२ चेंडूत ५१ धावांची खेळी साकारली. पण इतर फलंदाजांकडून रिषभला चांगली साथ मिळू शकली नाही. विशेष म्हणजे वानखेडेच्या मैदानावर दिल्लीच्या संघाला आपल्या डावात आज एकही षटकार लगावता आलेला नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनी आज दिल्लीच्या फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवल्याचं पाहायला मिळालं.

राजस्थानकडून जयदेव उनाडकट यानं पावर प्लेमध्येच दिल्लीला तीन दमदार झटके दिले. जयदेव उनाडकट यानं त्याच्या ४ षटकांमध्ये केवळ १५ धावा देत तीन बळी घेतले. यात पृथ्वी शॉ (२), शिखर धवन (९) आणि अजिंक्य रहाणे (८) या महत्वाच्या फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश आहे. दिल्लीचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मिस्तफिजूर रेहमान यानं दिल्लीला चौथा धक्का देत मार्कस स्टॉयनिस (०) याला खातंही उघडू दिलं नाही. 
 

Web Title: RR vs DC IPL 2021 Highlights Miller 62 Morris 36 power Royals to three wicket win over Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.