...तो विक्रम १३ वर्षे रिचर्ड््सच्या नावावर

३६ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्धची खेळी : वन-डेमध्ये फटकावल्या होत्या १८९ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:47 AM2020-06-01T04:47:13+5:302020-06-01T04:47:22+5:30

whatsapp join usJoin us
... That record is named after Richards for 13 years | ...तो विक्रम १३ वर्षे रिचर्ड््सच्या नावावर

...तो विक्रम १३ वर्षे रिचर्ड््सच्या नावावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हीव्हीयन रिचर्ड््स यांनी आजपासून ३६ वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टरमध्ये नाबाद १८९ धावांची आक्रमक खेळी करीत वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम जवळजवळ १३ वर्षांपर्यंत त्यांच्या नावावर होता, हा अद्याप एक विक्रम आहे.


वन-डेमध्ये एका डावातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आता भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी करीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते. रोहितच्या नावावर गेल्या ६६ महिन्यापासून हा विक्रम आहे. रोहितचा विक्रम किती काळ टिकतो, याबाबत उत्सुकता आहे. अन्य भारतीय कपिल देव, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर सर्वोच्च खेळीचा विक्रम फार काळ कायम राहिला नव्हता.


जर वन-डेमध्ये एका डावातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम व त्याचा अवधी याबाबत चर्चा केली तर पहिला वन-डे सामना मेलबोर्नमध्ये ५ जानेवारी १९७१ रोजी खेळला गेला होता. त्यात इंग्लंडच्या जॉन एड्रिचने ८२ धावा करीत वन-डेतील पहिला सर्वोच्च स्कोअर आपल्या नावावर केला होता. इंग्लंडच्याच डेनिस एमिस (१०३) याने दीड वर्षानंतर वन-डेतील पहिले शतक झळकावत हा विक्रम मोडला. एमिसचा विक्रम वर्षभरच कायम राहिला. वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेड्रिक्सने (१०५) हा विक्रम मोडला. त्यानंतर इंग्लंडच्या डेव्हिड लॉयडने (नाबाद ११६) वर्षभरानंतर हा विक्रम आपल्या नावावर केला. न्यूझीलंडचा ग्लेन टर्नरने पहिल्या विश्वकप (१९७५) स्पर्धेत पूर्व आफ्रिकाविरुद्ध नाबाद १७१ धावांची खेळी करीत फलंदाजांपुढे नवे आव्हान सादर केले.


टर्नरचा विक्रम ८ वर्षे कायम राहिला. भारतीय अष्टपैलू कपिल देवने १८ जून १९८३ ला झिम्बाब्वेविरुद्ध टनब्रिज वेल्समध्ये नाबाद १७५ धावांची खेळी करीत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. माजी भारतीय कर्णधाराच्या नावावर हा विक्रम केवळ ३४८ दिवस राहिला. कारण ३१ मे १९८४ ला रिचर्ड््सने नाबाद १८९ धावांची खेळी केली. रिचडर्््सच्या या विक्रमाला १२ वर्षे ११ महिने व २१ दिवस एकाही फलंदाजाला गवसणी घालता आली नाही. वन-डेमध्ये एका डावातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रदीर्घ काळ आपल्या नावावर कायम ठेवण्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. पाकिस्तानचा सईद अन्वर हा विक्रम मोडण्याच्या समीप पोहचला होता. अन्वरने १ मे १९९७ मध्ये भारताविरुद्ध चेन्नईमध्ये १९४ धावांची खेळी करीत रिचर्ड््सचा हा विक्रम मोडला होता. त्याच्या नावावर १२ वर्षे व ९ महिने हा विक्रम कायम राहिला. दरम्यान, झिम्बाब्वेच्या चार्ल्स कावेंट्रीने (नाबाद १९४) या विक्रमाची
बरोबरी साधली. (वृत्तसंस्था)

रिचर्ड््सचा विक्रम सध्या ११ व्या क्रमांकावर गेला आहे. एकट्या रोहितने तीन वेळा ही धावसंख्या ओलांडत द्विशतकी खेळी केली आहे.
तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये वन-डे क्रिकेटमधील पहिले द्विशतक (नाबाद २००) ठोकत अन्वर व कावेंट्री यांचा विक्रम मोडला
सेहवागने ८ जून २०११ मध्ये इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची खेळी करीत हा विक्रम आपल्या नावावर केला.

Web Title: ... That record is named after Richards for 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.