RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज विजय

RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित होणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 28, 2020 06:31 PM2020-10-28T18:31:47+5:302020-10-28T23:04:59+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs MI Live Score Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians IPL 2020 Live Score and Match updates | RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज विजय

RCB vs MI: मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफमध्ये प्रवेश, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB vs MI Latest News & Live Score : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील प्ले ऑफमधील पहिला संघ आज निश्चित झाला. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर सहज विजय मिळवून १६ गुणांसह प्ले ऑफमधील प्रवेश पक्का केला. सूर्यकुमार यादवनं चौकार-षटकारांची आतषबाजी केली.  त्यानं अर्धशतकाचं सेलिब्रेशन न करता RCBचा कर्णधार विराट कोहली याला टशन दिलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियात स्थान न मिळाल्याचा राग सूर्यकुमारनं या सामन्यात काढला. यादवच्या या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं सहज विजय मिळवला. 

RCB vs MI Latest News & Live Score :

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. हार्दिक १७ ( २ षटकार) धावांवर माघारी परतला. ७ चेंडू ७ धावांची गरज असताना किरॉन पोलार्डनं पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला. सूर्यकुमारनं नंतर अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून मुंबईचा विजय पक्का केला. सूर्यकुमार ४३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांवर नाबाद राहिला. मुंबईनं १९.१ षटकांत ५ बाद १६६ धावा करून विजय पक्का केला. 
 

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांना मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून देता आली नाही. धावफलकावर ३७ धावा असताना क्विंटन ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. युझवेंद्र चहलनं MIच्या दुसऱ्या सलामीवीराला बाद केले. इशान किशन २५ धावांवर बाद झाला. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या देवदत्तनं क्षेत्ररक्षणातही अफलातून झेल टिपला. सौरभ तिवारीला ( ५) मोहम्मद सिराजनं बाद केलं. 
 

प्रत्युत्तरात इशान किशन आणि क्विंटन डी'कॉक यांना मुंबई इंडियन्सला शानदार सुरुवात करून देता आली नाही. धावफलकावर ३७ धावा असताना क्विंटन ( १८) मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. 

जसप्रीत बुमराहनं ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकले अन् १४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. राहुल चहर, ट्रेंट बोल्ट व किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कर्णधार विराट कोहलीला ( ९) मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सौरभ तिवारीनं झेल टिपून कोहलीला माघारी पाठवले. एबी डिव्हिलियर्सची ( १५) तोफ आज थंडावली. किरॉन पोलार्डन त्याला स्लोव्हर फुलटॉसवर बाद केले. शिवम दुबेला ( २) जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केले. त्याच षटकात बुमराहनं RCBला मोठा धक्का देताना देवदत्तला माघारी पाठवले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. ख्रिस मॉरिसही ( ४) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करताना RCBला २० षटकांत ६ बाद १६४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.

रोहित शर्मा ( Rohit Sharma) सलग तिसऱ्या सामन्यात खेळणार नाही. किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात कोणताही बदल नाही, तर RCBच्या ताफ्यात तीन बदल आहेत. आरोन फिंचच्या जागी सलामीला आलेल्या जोश फिलिफनं युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलसह RCB ला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. राहुल चहरनं त्याला बाद केले. RCBला ७१ धावांवर पहिला धक्का बसला. पण, पडीक्कलनं त्याचा फॉर्म कायम राखला. त्यानं ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

कर्णधार विराट कोहलीला ( ९) मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सौरभ तिवारीनं झेल टिपून कोहलीला माघारी पाठवले. एबी डिव्हिलियर्सची ( १५) तोफ आज थंडावली. किरॉन पोलार्डन त्याला स्लोव्हर फुलटॉसवर बाद केले. शिवम दुबेला ( २) जसप्रीत बुमराहनं त्याला बाद केले. त्याच षटकात बुमराहनं RCBला मोठा धक्का देताना देवदत्तला माघारी पाठवले. देवदत्त ४५ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार मारून ७४ धावांवर माघारी परतला. 

आरोन फिंचच्या जागी सलामीला आलेल्या जोश फिलिफनं युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलसह RCB ला सावध सुरुवात करून दिली. IPL 2020 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिफनं २४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ३३ धावा केल्या. राहुल चहरनं त्याला बाद केले. RCBला ७१ धावांवर पहिला धक्का बसला. 

आरोन फिंचच्या जागी सलामीला आलेल्या जोश फिलिफनं युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलसह RCB ला सावध सुरुवात करून दिली. 

मुंबई इंडियन्स - क्विंटन डी'कॉक, इशान किशन, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटीन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, जोश फिलिफ, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सूंदर, डेल स्टेन, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

OUT - आरोन फिंच, नवदीप सैनी ( दुखापतग्रस्त), मोईन अली; IN - जोश फिलिफ, डेल स्टेन, शिवम दुबे 

Image

रोहितची दुखापत एवढी गंभीर नाही, मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ५ आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना त्याला का वगळले? टीम इंडियातून वगळ्याएवढी रोहितची दुखापत गंभीर आहे, मग तो अजून UAEत काय करतोय? तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी का रवाना झाला नाही? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.

Web Title: RCB vs MI Live Score Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.