RCB vs KXIP Live Score Royal Challengers Bangalore vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates | RCB vs KXIP Live Score: आरसीबीचा 'विराट' पराभव; पंजाबनं ९७ धावांनी लोळवलं

RCB vs KXIP Live Score: आरसीबीचा 'विराट' पराभव; पंजाबनं ९७ धावांनी लोळवलं

दुबई: आयपीएलमध्ये (IPL 2020) आज किंग्स इलेव्हन पंजाबनं (Kings XI Punjab) विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Bangalore) दारुण पराभव केला. पंजाबनं दिलेल्या २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव १०९ धावांवर संपुष्टात आला. पंजाबच्या शिस्तबद्ध आणि भेदक माऱ्यासमोर आरसीबीचा डाव गडगडला. तत्पूर्वी पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं धडाकेबाज १३२ धावा करत आरसीबीची धुलाई केली. पंजाबनं मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

RCB vs KXIP Latest News & Live Score:
 

- आरसीबीचा डाव १०९ धावांवर संपुष्टात; ९७ धावांनी पराभव

- मुरुगन अश्विननं सैनीला धाडलं माघारी; आरसीबी ९ बाद १०६ धावा

- रवी बिश्नोईची शानदार गोलंदाजी; उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदरला धाडलं माघारी; बंगलोर ८ बाद १०१ धावा

- मॅक्सवेलनं उडवला शिवम दुबेचा त्रिफळा; बंगलोर ६ बाद ८३ धावा

- डिव्हिलियर्स २८ धावा काढून तंबूत; बंगलोर ५ बाद ५७

- फिंच २० धावा काढून माघारी; बंगलोर ४ बाद ५३ धावा

- २०७ धावांचा पाठलाग करताना बंगलोरची खराब सुरुवात; ६ षटकांनंतर ३ बाद ४० धावा

- विराट कोहली अवघी एक धाव काढून माघारी; बंगलोरला तिसरा धक्का- पड्डीकल, फिलिप स्वस्तात माघारी; बंगलोरला अवघ्या ३ धावांवर दोन धक्के

- २० षटकांत पंजाबच्या ३ बाद २०६ धावा; राहुल नाबाद १३२

- पंजाबचा कर्णधार राहुलचं शानदार शतक - १७ व्या षटकानंतर पंजाब ३ बाद १४६; राहुल ८४, करुण नायर ३ धावांवर नाबाद

- शिवम दुबेच्या गोलंदाजींवर मॅक्सवेल बाद; पंजाबला तिसरा धक्का

- निकोलस पूरन १७ धावांवर बाद; पंजाबला दुसरा धक्का

- पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलचं शानदार अर्धशतक; पंजाबच्या १३ षटकांत १ बाद १०६ धावा

- १० षटकांनंतर पंजाबच्या १ बाद ९० धावा; राहुल ४६, तर पूरन ११ धावांवर नाबाद

- चहलच्या गोलंदाजीवर मयंकचा त्रिफळा; मयंक २६ धावांवर बाद

- पाच षटकांनंतर पंजाबच्या बिनबाद ४१ धावा; राहुल २१, तर मयंक २० धावांवर नाबाद

- पहिल्या ३ षटकांत पंजाब बिनबाद २६; राहुल, मयंक प्रत्येकी १३ धावांवर नाबाद

- कर्णधार राहुलची आक्रमक सुरुवात; आयपीएलमधील २ हजार धावा पूर्ण

- किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय- पंजाबचे किंग्स स्टेडियमवर पोहोचले

- बंगलोरची टीम स्टेडियमवर दाखल- पंजाबचा संघ पहिल्या विजयासाठी, तर बंगलोरचा संघ विजयी लय कायम राखण्याच्या प्रयत्नात;

- थोड्याच वेळात नाणेफेक

हवामान कसं असेल?
तापमान ४१ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहील. आर्द्रता ३० टक्के राहण्याची शक्यता तर वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास असू शकतो.

खेळपट्टीचा अंदाज काय?
खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल. सोमवारी झालेल्या लढतीत राशिद खान व युजवेंद्र चहल यांना खेळपट्टीकडून बरीच मदत मिळाली. फलंदाजांना फिरकीपटूंविरुद्ध सांभाळून खेळावं लागेल.

मजबूत बाजू- 
बँगलोर- सोमवारी मिळालेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल महत्त्वाचा असेल.
राजस्थान- मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्मात आहे. राहुल, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारख्या फलंदाजांची उपस्थिती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईसुद्धा फॉर्मात आहेत.

कमजोर बाजू-
बँगलोर- दुखापतग्रस्त असल्यामुळे अष्टपैलू ख्रिस मॉरिस खेळू शकणार नाही. त्याला स्नायूच्या दुखापतीनं सतावलं आहे.
राजस्थान- मधल्या फळीतील फलंदाजांना पहिल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घ्यावा लागेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RCB vs KXIP Live Score Royal Challengers Bangalore vs Kings XI Punjab IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.