Ravi Shastri warns Rishabh Pant | रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग

रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग

नवी दिल्ली : भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतचा चुकांचा घडा आता भरल्याचे दिसत आहे. कारण भारताचे मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पंतला चांगलाच दम भरला आहे. यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.
शास्त्री यांनी पंतच्या चुकांचे काही दाखले दिले आहेत. शास्त्री म्हणाले की, "वेस्ट इंडिजमध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथील सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्याच्यासमोर कर्णधार विराट कोहली हा खेळपट्टीवर होता आणि भारतीय संघ धावांचा पाठलाग करत होता. त्यावेळी संघाला पंतच्या धावांची गरज होती. पण पंत पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर त्याला संघात स्थान मिळणार नाही."
पंतच्या गुणवत्तेबाबत शास्त्री म्हणाले की, " पंतच्या गुणवत्तेबाबत आम्हाला काहीच शंका नाही. यापूर्वीच त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. पण पंतचे शॉट सिलेक्शन चुकताना पाहायला मिळते. सामन्यामध्ये जशी परिस्थिती आहे त्यानुसार प्रत्येकाने खेळ करायचा असतो, पण हे पंतला आतापर्यंत जमलेले नाही. कारण त्याने बऱ्याच वेळा संघाच्या अपेक्षांची पूर्ती केलेली नाही. त्यामुळे यापुढे जर पंत असाच खेळत राहीला तर नक्कीच त्याचे संघातील स्थान धोक्यात आहे."

... नाहीतर बाहेरचा रस्ता धरा; विराट कोहलीची खेळाडूंना वॉर्निंग
भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील खेळाडूंना थेट वॉर्निंग दिली आहे. तुम्हाला जेवढी संधी मिळेल, त्यामध्ये स्वत: ला सिद्ध करा नाही तर संघातील तुमचे स्थान अबाधित राहू शकत नाही, असे कोहलीने सांगितले आहे.

आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक लक्षात ठेवून कोहलीने खेळाडूंना हे सांगितल्याचे समजत आहे. आतापासून विश्वचषकापर्यंत जवळपास 30 ट्वेन्टी-20 सामने खेळवले जाणार आहे. या 30 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये बहुतांशी युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. संधी मिळाल्यानंतर खेळाडूंनी जर आपली छाप पाडली नाही तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवता येऊ शकतो.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ravi Shastri warns Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.