मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे कायम चर्चेत असतात. आता तर ते एका फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये रवी शास्त्री यांच्याबरोबर एक सुंदर तरुणी पाहायला मिळत आहे. पण ही तरूणी आहे तरी कोण, असा सवाल आता चाहते विचारू लागले आहेत.

Image result for ravi shastri with raveena tondon

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शास्त्री हे अलिबागला गेले आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघाचे सामने नाहीत. त्यामुळे संघाला विश्रांती मिळालेली आहे. त्यामुळे आता थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी शास्त्री यांनी थेट अलिबाग गाठल्याचे समजत आहे.

Image result for ravi shastri with srk

या फोटोमध्ये रवी शास्त्री यांच्याबरोबर आहे बॉलीवूड किंग शाहरुख खान. यंदाचा थर्टी फर्स्ट हे दोघे एकत्र साजरा करणार असल्याचेही समजत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर उद्योगपती गौतम सिंघानिया आहेत. या फोटोमध्ये रवी शास्त्री एका सुंदरीच्या खांद्यावर हात ठेवल्याचे पाहायला मिळाले आहे. ही सुंदरी नेमकी आहे तरी कोण, असा सवाल आता तुम्हाला पडला असेल.

Image result for ravi shastri with raveena tondon

रवी शास्त्री आणि बॉलीवूडचा जवळचा संबंध आहे, असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी शास्त्री आणि बॉलीवूडची अभिनेत्री अमृता सिंग यांच्यामध्ये अफेअर असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी शास्त्री एका सुंदरीला डेटिंग करत असल्याचेही वृत्त प्रसारीत झाले होते. पण आता थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी ते कोणत्या सुंदरीबरोबर आहेत, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे.

Image result for ravi shastri with amruta singh

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही सेलिब्रेटी यावेळी एकत्र अलिबागला जमल्याची चर्चा आहे. यामध्ये शास्त्री, सिंघानिया, शाहरुख यांचा समावेश आहे. शास्त्री यांच्याबरोबर या फोटोमध्ये असलेली सुंदरी एक अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे 'तू चीझ बडी हैं मस्त, मस्त' फेम रवीना टंडन.

Image result for ravi shastri affair with raveena tandon

Web Title: Ravi Shastri celebrates 'Thirty First' with Raveena Tondon in alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.