भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने आयपीएल फ्रँचायझीबद्दल पंजाब किंग्जबद्दल धक्कादायक दावा केला. पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग हे मधल्या फळीतील भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवत आहेत. हे असेच चालू राहिले तर, पंजाबचा संघ या हंगामात विजेतेपद जिंकू शकणार नाही, असे त्याने म्हटले आहे. याशिवाय, त्याने रिकी पाँटिगवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे
शनिवारी कोलकाताच्या ईडन गार्डनवर कोलाकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळण्यात आलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यानंतर मनोज तिवारीने एक्सवर एक पोस्ट केली, ज्यात त्याने पंजाब किंग्जच्या व्यवस्थापनावर टीका केली.
मनोज तिवारी काय म्हणाला?
मनोज तिवारीने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'मला असे वाटते की, यावर्षी पंजाबचा संघ आयपीएल जिंकू शकणार नाही. कोलकाता आणि पंजाब यांच्यात शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकांनी भारताचा फॉर्मात असलेला फलंदाज नेहल वढेरा आणि शशांक सिंह यांना फलंदाजीसाठी पाठवले नाही. त्याऐवजी त्यांनी परदेशी खेळांडूवर विश्वास दाखवला. परंतु,ते चांगली कामगिरी करू शकले नाही. खालच्या फळीतील भारतीय फलंदाजांवर त्यांनी विश्वास दाखवला नाही. हे असेच सुरू राहिले तर पंजाबचा संघ टॉप-२ मध्ये स्थान मिळूनही विजेतेपद जिंकण्यापासून दूर राहील.'
पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाज ठरले प्लॉप
कोलकाताविरुद्धच्या सामन्या पंजाबकडून ग्लेन मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर आला. त्यानंतर मार्को जान्सन आणि जोश इंग्लीस यांना अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या नेहल वढेरा आणि पॉवर हिटर शशांक सिंग यांना फलंदाजीसाठी संधी मिळाली नाही. या सामन्यात पंजाब संघ शेवटच्या ६ षटकांत फक्त ५० धावाच करू शकला. हे दोघेही फलंदाजीसाठी आले असते तर कदाचित पंजाबच्या धावसंख्येत आणखी भर पडली असती.
पावसामुळे सामना रद्द
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, हा सामना पावसामुळे रद्द झाला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ४ विकेट गमावून २०१ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाने पहिल्या षटकात एकही विकेट्स न गमावता सात धावा केल्या. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Web Title: Punjab Kings will not win IPL 2025 because Ricky Ponting does not trust Indian players- Manoj Tiwary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.