धावा निघत नसतील तेव्हा पृथ्वी शॉ...; कोच रिकी पॉँटिंगचा मोठा खुलासा

पाँटिंग गेली दोन वर्षे २१ वर्षांच्या पृथ्वीच्या कामगिरीवर नजर रोखून आहेत. मागच्या पर्वात दोन अर्धशतकांची नोंद केल्यानंतर पृथ्वी खराब कामगिरी करीत असताना नेट्‌समध्ये फलंदाजी सरावासदेखील नकार द्यायचा. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:39 AM2021-04-06T02:39:42+5:302021-04-06T07:23:59+5:30

whatsapp join usJoin us
Prithvi Shaw unwilling to bat at nets during lean patch says Ricky Ponting | धावा निघत नसतील तेव्हा पृथ्वी शॉ...; कोच रिकी पॉँटिंगचा मोठा खुलासा

धावा निघत नसतील तेव्हा पृथ्वी शॉ...; कोच रिकी पॉँटिंगचा मोठा खुलासा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलच्या मागच्या पर्वात पृथ्वी शॉ अपयशी ठरत होता. त्यावेळी तो नेट्‌समध्ये फलंदाजीसाठी सरावाला देखील येत नसे, असा खुलासा दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी केला. या प्रतिभावान फलंदाजाला आयपीएल सुरू होण्याआधी सरावातील सवयी सुधाराव्या लागतील, यावर कोचने भर दिला आहे.

‘पृथ्वी काय बोलला, हे थोडावेळ मला कळलेच नाही. आता मात्र तो बदलला असावा. मागच्या काही महिन्यांपासून त्याने भरपूर मेहनत घेतली. पृथ्वीचा सरावाचा सिद्धांत बदलला असावा, अशी अपेक्षा करतो. त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यास तो सुपरस्टार खेळाडू बनू शकतो,’ असे पॉंटिंग म्हणाले.
२९ मार्च रोजी दिल्ली संघात दाखल झाल्यानंतर बायोबबलमध्ये आठवडाभर विलगीकरणात होते.

पाँटिंग गेली दोन वर्षे २१ वर्षांच्या पृथ्वीच्या कामगिरीवर नजर रोखून आहेत. मागच्या पर्वात दोन अर्धशतकांची नोंद केल्यानंतर पृथ्वी खराब कामगिरी करीत असताना नेट्‌समध्ये फलंदाजी सरावासदेखील नकार द्यायचा. 

तो धावा काढत नसेल तर सराव करणे आवडत नव्हते. धावा काढल्या की, तो सरावातही उत्साही दिसत होता. त्याने चार- पाच सामन्यांत दहापेक्षा कमी धावा केल्या. मी त्याला नेट्‌समध्ये सराव कर आणि समस्या कुठे आहे याचा शोध घेण्यास सांगितले तेव्हा त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून चक्क, ‘आज सराव करणार नाही’ असे म्हटल्याचे,' पॉंटिंगनी सांगितले.

Web Title: Prithvi Shaw unwilling to bat at nets during lean patch says Ricky Ponting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.