Prithvi Shaw showed the gestures like virat kohli, explaining what ... | तुफानी खेळी साकारल्यावर पृथ्वी शॉने कोणाला हातवारे करून दाखवले, काय आहे या इशाऱ्याचा अर्थ...

तुफानी खेळी साकारल्यावर पृथ्वी शॉने कोणाला हातवारे करून दाखवले, काय आहे या इशाऱ्याचा अर्थ...

मुंबई : उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी उठल्यावर आज भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारली. मैदान जिंकल्यावर मात्र पृथ्वीने काही हातवारे केले, यामध्ये नेमका काय अर्थ दडलेला होता, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल...

पृथ्वीने आज बंदीनंतर पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकले. पुनरागमन करताना आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली. पण या अर्धशतकानंतर त्याने संघाला हातवारे करून काही तरी दाखवण्याचा प्रयत्न केला.

काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही अशा प्रकारचे हातवारे केले होते. पृथ्वीनेही कोहलीची कॉपी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. अर्धशतक पूर्ण झाल्यावर पृथ्वीने बॅटीकडे हात केला आणि बोलण्याचा अभिनय करून दाखवला. माझी बॅटच बोलते, असे पृथ्वीला यावेळी सांगायचे होते.


बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी
भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले.

Image

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आज पृथ्वीवरील बंदी उठली आणि त्याने दिमाखात पुनरागमन केले आहे.

बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले पुनरागमन साजरे केले. मुंबईचा आज आसामविरुद्ध सामना होता. या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. पृथ्वीच्या दमदा फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ८३ धावांनी जिंकला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prithvi Shaw showed the gestures like virat kohli, explaining what ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.