PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC | IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021: धोनीनं सामना तर गमावलाच, पण १२ लाखांचा दंडही भरावा लागला!

IPL 2021, MS Dhoni: चेन्नई सुपरकिंग्ज संघानं (Chennai Super Kings) शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धचा सामना तर गमावलाच पण CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला याला सामन्यातली एक चूकही महागात पडली आहे. महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलनं १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. (PL 2021: MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over-rate in CSK's clash against DC)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'स्लो-ओव्हर रेट'चा ठपका चेन्नई सुपरकिंग्ज संघावर ठेवण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार एका तासात एका डावात किमान १४.१ षटकांचा खेळ होणं बंधनकारक आहे. धोनीची या मोसमातली ही पहिलीच चूक असल्यानं केवळ १२ लाखांचा दंड ठोठावला आहे. पण दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंडाची रक्कम २४ लाख, तर तिसऱ्या वेळेस ३० लाखांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो आणि महत्वाची बाब म्हणजे एका सामन्याची बंदी देखील येऊ शकते. 

खरंतर चेन्नईच्या संघानं दिल्ली विरुद्धच्या सामन्यात फक्त १८.४ षटकंच टाकली. दिल्लीनं १९ व्या षटकातच चेन्नईचं लक्ष्य गाठलं होतं. पण चेन्नईनं षटकं पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्यानं आयपीएलकडून कारवाई करण्यात आली आहे. 

धवन-पृथ्वीचा धमाका
चेन्नईनं दिलेलं १८९ धावांचं तगडं आव्हान दिल्लीच्या सलामीवीरांच्या शतकी भागीदारीपुढे ठेंगणं झालं. शिखर धवननं ८५ तर पृथ्वी शॉनं ७२ धावांची जबरदस्त खेळी साकारली आणि संघाला विजय प्राप्त करुन दिला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: PL 2021 MS Dhoni fined Rs 12 lakh for slow over rate in CSK clash against DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.