T20 World Cup : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या झिम्बाब्वेची बिकट अवस्था! खेळाडूंना मिळतो तुटपुंजा पगार

ऑस्ट्रेलियामध्ये T20 वर्ल्ड कप सुरू आहे. हा वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेच्या टीमने गाजवला आहे. उत्कृष्ठ अशी खेळी करत पाकिस्तानच्या टीमला हरवले.

ऑस्ट्रेलियामध्ये T20 वर्ल्ड कप सुरू आहे.(T20 World Cup) हा वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेच्या टीमने गाजवला आहे. उत्कृष्ठ अशी खेळी करत पाकिस्तानच्या टीमला हरवले. या मॅचमुळे झिम्बाब्वे टीमची सगळीकडे चर्चा सुरू आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून झिम्बाब्वेने दाखवून दिले की त्यांना हलक्यात घेणे टीमसाठी अवघड असू शकते. पण झिम्बाब्वेच्या खेळाडूंची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान या देशांच्या खेळाडूंपेक्षा खूपच कमी पगार मिळतो.

झिम्बाब्वेचे खेळाडू X, A, B आणि C या चार श्रेणींमध्ये विभागले आहेत. (T20 World Cup) X दर्जाच्या खेळाडूंना प्रत्येक महिन्याला ५ हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे ४.११ लाख रुपये मिळतात.

ग्रेड-A खेळाडूंना एका महिन्यात ३५०० यूएस डॉलर्स मिळतात. ग्रेड-B खेळाडूंना प्रत्येक महिन्याला दोन हजार डॉलर म्हणजेच १. ६४ लाख रुपये मिळतात. ग्रेड-C च्या खेळाडूंना प्रत्येक महिन्याला १५०० डॉलर म्हणजेच सुमारे १.२३ लाख रुपये मिळतात.

झिम्बाब्वेच्या खेळाडूंना कसोटी सामना खेळण्यासाठी २००० डॉलर १.६४ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी १००० डॉलर सुमारे ८२ हजार रुपये, आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ५०० डॉलर ४१ हजार रुपये दिले जातात.

झिम्बाब्वेच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे नाव नॅशनल प्रीमियर लीग आहे. (T20 World Cup) ही लीग जिंकणाऱ्या संघाला ८.५० लाख रुपये मिळतात. म्हणजेच आयपीएल लिलावात २० लाख रुपयांच्या खेळाडूच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा ते खूपच कमी आहेत.

झिम्बाब्वेची टीमला अगोदर जास्त पैसे मिळायचे. पण फ्लॉवर बंधू अँडी आणि ग्रँट, मरे गुडविन, पॉल स्ट्रॅंग आणि हीथ स्ट्रीक यांच्या जाण्याने झिम्बाब्वेचे क्रिकेटची स्थिती ढासळली.

यासोबतच अनेक वेळा झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी कमी पगारामुळे खेळावर बहिष्कार टाकला होता. नंतर, झिम्बाब्वेच्या सरकारनेही तेथील क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जुलै २०१९ मध्ये झिम्बाब्वेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सहा महिन्यांसाठी निलंबित केले.

झिम्बाब्वेच्या टीमपेक्षा पाकिस्तानच्या टीमची थोडी चांगली परिस्थिती आहे.

पाकिस्तानाच्या खेळाडूंना एक कसोटी खेळण्यासाठी सुमारे ३ लाख रुपये मिळतात. तर एकदिवसीयसाठी सुमारे १.८७ लाख आणि टी-20 साठी १.३५ लाख मिळतात.

उच्च श्रेणीतील पाकिस्तानी खेळाडूंना रेड-बॉलसाठी प्रति महिना १०,५०,००० पाकिस्तानी रुपये रिटेनशन फी म्हणून मिळतात. व्हाईट चेंडूच्या कराराला ९,५०,००० पाकिस्तानी रुपये मिळतात.