Cricket Buzz»फोटो गॅलरी »W,W,W,W,W,W,W...; 'या' बॉलरनं सलग ६ विकेट घेतल्या, एकाच ओव्हरमध्ये दुहेरी हॅटट्रिकW,W,W,W,W,W,W...; 'या' बॉलरनं सलग ६ विकेट घेतल्या, एकाच ओव्हरमध्ये दुहेरी हॅटट्रिक By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:28 PMOpen in App1 / 10क्रिकेटमध्ये रोज नवनवीन रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी क्षेत्ररक्षण.. क्रिकेटच्या मैदानावर दिवसभर काही ना काही पराक्रम गाजतो. पण तुम्हाला माहित आहे का की अलीकडेच एका युवा गोलंदाजाने असा विक्रम केला आहे ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. 2 / 10क्रिकेटच्या खेळात हॅट्ट्रिक घेण्याचे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते, हे फार कमी लोक करू शकतात. पण असा एक गोलंदाज आहे ज्याने एकाच षटकात दोन हॅटट्रिक घेतली. साहजिकच हे यश या गोलंदाजासाठी खूप मोठे आहे.3 / 10एका गोलंदाजाने आपल्या षटकातील प्रत्येक चेंडूवर विकेट घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाला हॅटट्रिक घेणे म्हणजेच सलग ३ विकेट्स घेणे खूप अवघड असते. 4 / 10पण ऑलिव्हर व्हाईटहाऊस या १२ वर्षीय इंग्लिश गोलंदाजाने आपल्या षटकातील प्रत्येक चेंडूवर विकेट घेत क्रिकेटच्या जगतात नवा विश्वविक्रम घडवला आहे. म्हणजेच या गोलंदाजाला एकाच षटकात दुहेरी हॅट्ट्रिक घेण्यात यश आले आहे.5 / 10या सामन्यात ऑलिव्हर व्हाइटहाऊसने दोन षटके टाकली. त्याच्या दोन्ही षटकांत फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही. त्याचबरोबर या खेळात त्याने एकूण ८ विकेट्स घेतल्या. मात्र, तो आंतरराष्ट्रीय सामना नव्हता, त्यामुळे ऑलिव्हरला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. 6 / 10या सामन्यात ऑलिव्हर ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळत होता आणि त्याचा संघ कुकहिल क्लबविरुद्ध खेळत होता. ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक ऑलिव्हरची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की अशी कामगिरी पाहून माझा अजून विश्वास बसत नाही.7 / 10ऑलिव्हरने दाखवलेल्या खेळामागे त्याची मेहनत, फोकस आहे. त्याने आपल्या खेळाने असा प्रभाव सोडला आहे जो दीर्घकाळ टिकेल. ही त्याच्या सर्वोत्तम क्रिकेट कारकिर्दीचीही सुरुवात असू शकते असं क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटलं. 8 / 10ब्रुम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबच्या पहिल्या संघाचा कर्णधार जेडेन लेविट यांनी सांगितले की, ऑलिव्हरने जे केले त्यावर माझा विश्वास बसत नाही. ऑलिव्हरला ही किती मोठी उपलब्धी आहे याची कल्पनाही नसेल, पण नंतर त्याला त्याचे महत्त्व कळेल.9 / 10क्लबने दुहेरी हॅटट्रिकसह ऑलिव्हरचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्यानंतर काही तासांतच ऑलिव्हरची कामगिरी जगाला कळाली आणि तो हिरो बनला. क्लबने त्याच्याबद्दल केलेल्या पोस्टला काही तासांत ४५००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.10 / 10डावखुरा फिरकीपटू ऑलिव्हरने या सामन्यात एकूण दोन षटके टाकली आणि एकही धाव न देता एकूण आठ बळी घेतले. ऑलिव्हरचे कुटुंब खेळाशी जोडले गेले आहे. त्याची आजी एक उत्कृष्ट टेनिसपटू आहे. ऑलिव्हरच्या आजीने १९६९ मध्ये विम्बल्डन जिंकले, जे टेनिसच्या चार ग्रँडस्लॅमपैकी एक आहे. तिचे नाव एन जोन्स आहे आणखी वाचा Subscribe to Notifications