किवी खेळाडूला बाळाचा बाप होशील का विचारणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीचा Hardik Pandya ला सल्ला अन् झाला कल्ला!

IND vs AUS : Hardik Pandya - भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय गोलंदाजांना यशस्वी बचाव करता आला नाही.

IND vs AUS : Hardik Pandya - भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली. २०८ धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय गोलंदाजांना यशस्वी बचाव करता आला नाही. हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी दमदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान उभे केले होते. पण, मॅथ्यू वेडनं अंतिम षटकांत तुफान फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला,.

लोकेश ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांवर माघारी परतला. सूर्याने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. त्याने २०व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या. भारताने ६ बाद २०८ धावांचा टप्पा गाठला.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीन ( ६१), स्टीव्ह स्मिथ ( ३५) व मॅथ्यू वेड ( ४५*) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अक्षर पटेल ( ३-१७) वगळल्यास भुवनेश्वर कुमार ( ४-०-५२-०), हर्षल पटेल ( ४-०-४९-०), हार्दिक पांड्या ( २-०-२२-०), युजवेंद्र चहल ( ३.२-०-४२-१) व उमेश यादव ( २-०-२७-०) यांनी निराश केले. या पराभवानंतर हार्दिकने एक ट्विट केलं आणि त्यावर पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी ( Pakistani actress Sahar Shinwari) हिने ट्रोल केले.

हार्दिकने लिहिले की, आम्ही शिकू आणि चांगली कामगिरी करू.. आमच्या या प्रवासात सोबत असलेल्या फॅन्सचे आभार... आता हार्दिकच्या या ट्विटवर अभिनेत्रीने लिहिले की, २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना आहे आणि कृपया तोही सामना हरा. कारण त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल.

योगायोग असा की मंगळवारी पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर इंग्लंडकडून हार मानावी लागली. हार्दिकला ट्रोल करणाऱ्या सहर शिनवारीला नेटिझन्सनी खडेबोल सुनावले. एकाने लिहिले की, तू तुझं घर सांभाळ, शेजारांच्या घरात वाकून पाहून नकोस.

याच सहरने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जीमी निशॅम यालाही माझ्या मुलांचा बाप होशील का असा सवाल केला होता आणि त्यावर क्रिकेटपटूनेही भारी उत्तर दिले होते.