कोहली ते सूर्या! IPL मध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या फलंदाजांची यादी

इथं एक नजर टाकुयात आयपीएमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर सिक्सर मारणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील सामन्यात रवी बिश्नोई याने बुमराहच्या गोलंदाजीवर सिक्सर मारल्यावर जोरदार सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. याची चांगलीच चर्चाही रंगली.

जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचा सामना करणं भल्य भल्या फलंदाजांसाठी मोठं चॅलेंज असते. त्यामुळेच बिश्नोईसाठी षटकार मारण्याचा क्षण खास होता.

इथं एक नजर टाकुयात IPL मध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या खास रेकॉर्डवर

आयपीएलमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा एबी डिविलियर्सच्या नावे आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत बुमराहचा सामना करताना ८ षटकार मारले आहेत.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही दक्षिण आफ्रिकेचा बॅटर आहे. जेपी ड्युमिनी याने बुमराहच्या गोलंदाजीवर ६ षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे.

जसप्रीत बुमराहने विराट कोहलीच्या रुपात आयपीएलमधील पहिली विकेट घेतली होती. त्या कोहलीने बुमराहला आतापर्यंत ६ षटकार मारले आहेत.

KL राहुलसह पॅट कमिन्ससह ड्वेन ब्रावो, फाफ ड्युप्लेसी, दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथप्पा या फलंदाजांनी आयपीएलमध्ये बुमराहच्या गोलंदाजीवर प्रत्येकी ४-४ षटकार मारले आहेत.

बुमराहला सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. केकेआरकडून खेळताना त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर ३ षटकार मारले आहेत. त्याच्यासह रिषभ पंत, रायडू, स्मिथ यांनीही बुमराहचा सामना करताना प्रत्येकी ३-३ षटकार मारले आहेत.

एमएस धोनीसह अब्दुल समद याने बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.