क्रिकेटरनं प्रेमाच्या गावात पोहचल्यावर आयफेल टॉवरचा खास नजारा दाखवला; पण 'लव्ह स्टोरी' मात्र लपवली?

यशस्वीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले फोटो, पण...

भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल इंग्लंड दौऱ्यानंतर आता थेट पॅरिसमध्ये पोहला आहे.

फ्रान्समधील पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे खास फोटो युवा क्रिकेटरनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये यशस्वी जैस्वाल सायकल चालवण्याचा आनंद घेताना दिसतोय.

यशस्वी जैस्वाल या फोटोमध्ये आयफेल टॉवर दाखवताना दिसत असला तरी आपल्यासोबत 'लव्हर' असल्याची गोष्ट त्याने लपवल्याचे दिसते. कारण काही रिपोर्ट्समध्ये तो कथित गर्लफ्रेंडसोबत प्रेमाच्या गावात फिरायला गेलाय असा दावा करण्यात येत आहे.

कोण आहे ती? जिच्यासोबत यशस्वी जैस्वाल पॅरिसमध्ये भटंकतीला गेलाय.? असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.

यशस्वी जैस्वालनं मॅडी हॅमिल्टन आणि तिचा भाऊ हेन्री यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. यात जी तरुणी दिसतीये त्या मॅडीच्या प्रेमात यशस्वी क्लीन बोल्ड झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. प्रेमाच्या शहरात तो तिच्यासोबतच गेल्याचे बोलले जात आहे.

मॅडी ही एक न्यूट्रिशनिस्ट आहे. आयपीएल दरम्यान ती राजस्थान रॉयल्सच्या संघाला चीअर करताना दिसली आहे. तिची ही झलक यशस्वीसोबतच्या नात्याची हिंट देणारी आहे.

मॅडी अन् यशस्वी यांच्यात प्रेमाचा खेळ रंगला; पॅरिसच्या दौऱ्यावरही ते जोडीनं गेलेत; अशी चर्चा रंगत असली तरी यशस्वीनं अद्याप उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला ही जोडी प्रेमाचा लपंडाव खेळतीये असेच म्हणावे लागेल.