Join us  

WTC Final: शुभमन गिल नव्हे, 'हे' आहेत टीम इंडियाचे TOP 5 'हुकूमी एक्के'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 1:19 PM

Open in App
1 / 6

Team India Top 5 Match winners: WTC Final 2023चा सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा सामना होणार यात वादच नाही. नुकत्याच झालेल्या IPL मध्ये भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल तुफान फॉर्मात दिसला. पण त्याच्यापेक्षाही प्रतिभावान असे ५ खेळाडू भारताकडे आहेत, जे एकट्याच्या जीवावर टीम इंडियाला टेस्ट चॅम्पियन बनवू शकतील.

2 / 6

रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja)- रवींद्र जडेजा हा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. त्याने IPL Final मध्ये त्याची चमक दाखवून दिली आहे. अशक्य वाटणारी विजयश्री त्याने खेचून आणली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजाने बॅट, बॉल आणि फिल्डिंग तिन्ही प्रकारे ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याची क्षमता राखतो.

3 / 6

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)- टेस्ट क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा हे टीम इंडियाचे सर्वात घातक अस्त्र आहे. त्याने याआधीही ऑस्ट्रेलियाला रडवले आहे. नुकताच पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळून सज्ज झालाय. आतापर्यंत 102 कसोटी खेळलेल्या पुजाराच्या नावे 7,154 धावा आहेत. तो संघाला नक्कीच जिंकू शकतो.

4 / 6

विराट कोहली (Virat Kohli)- टीम इंडियाचं 'रनमशिन' विराट कोहली सध्या धमाकेदार फॉर्मात आहे. IPL मध्ये त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतकांसह 639 धावा केल्या. WTC फायनलमध्ये विराट कोहली मोठा मॅचविनर ठरू शकतो. तसेच मैदानात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला विराट त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर देऊ शकतो. त्यामुळे परदेशी खेळाडूही त्याला थोडेसे घाबरून असतात.

5 / 6

मोहम्मद शमी (Mohammed Shami)- मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची धार IPL मध्ये पाहायला मिळाली. टेस्ट क्रिकेटमध्येही तो टीम इंडियाचा सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. गेल्या वर्षभरात शमीने संघाला बुमराहची फारशी उणीव भासू दिली नाही. इंग्लंडच्या स्विंगला पोषक खेळपट्टीवर शमीची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाला चांगलीच धडकी भरवेल यात वाद नाही.

6 / 6

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)- फायनलच्या सामन्यात अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी X फॅक्टर ठरू शकतो. रहाणेला 2014, 2018 आणि 2021च्या इंग्लंड दौऱ्याचा अनुभव आहे. शांत व संयमी अजिंक्य रहाणे मधल्या फळीत असल्याचा टीम इंडियाला फायदाच होईल. तसेच, वेळ पडल्यास आक्रमक खेळण्याची वृत्तीही त्याने IPLमध्ये दाखवून दिली आहे. 82 कसोटीत त्याच्या 4931 धावा आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअजिंक्य रहाणेरवींद्र जडेजा
Open in App