WPL Auction 2023 : ३ वर्षांची असताना वडील गेले, आईने लहानाचे मोठे केले; आज पोरीनं कोट्यवधी कमावले

WPL Auction 2023 : महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधनाचे नाणे खणखणीत वाजले, पण हिमाचलच्या पोरीनं मन जिंकले...

महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात आज हिमाचल प्रदेशच्या रेणुका सिंग ठाकूरसाठी RCB ने १.५ कोटी मोजले

रेणूका सिंग ठाकूर ही हिमाचल प्रदेश येथील जलदगती गोलंदाज आहे आणि तिच्या घरात आज आनंदाचे वातावरण आहे

हिमाचल येथील रोहरू शहरातील पार्सा गावातला तिचा जन्म आणि तिला RCBने ताफ्यात घेतल्यावर आईने मिठाई वाटली

तिच्या वडिलांना क्रिकेट खूप आवडायचे, म्हणूनच त्यांनी मोठ्या मुलाचे नाव विनोद कांबळी याच्या नावावरून ठेवले.

रेणूका सिंग ३ वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरवले. पण, वडिलांची क्रिकेटमधील रूची रेणूकामध्ये आली.

तिचे वडील हे हिमाचल प्रदेशच्या Irrigation and Public Health department येथे कामाला होते. आई सुनिता यांनी रेणूका व विनोद यांना वाढवले.

रेणूका सिंगने प्लास्टिक्सच्या बॅटीने सराव केला अन् इतरांकडून किट्स उधारीवर घेऊन क्रिकेटचे स्वप्न जोपासले

रेणूका सिंगने २०२१मध्ये ट्वेंटी-२०त, तर २०२२ मध्ये २०२२ मध्ये भारतीय महिला संघाकडून पदार्पण केले

७ वन डे सामन्यात तिने १८ विकेट्स , तर २८ ट्वेंटी-२० सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत.