WPL 2023: Virat Kohli चं नाव ऐकताच Smriti Mandhana म्हणाली- "मला हे अजिबात आवडत नाहीये..."

महिला IPL म्हणजेच WPL मध्ये स्मृतीकडे RCB संघाचे कर्णधारपद आहे.

Smriti Mandhana Virat Kohli, RCB: महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) दुसऱ्या सामन्यात रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले. स्मृती मंधाना महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या एडिशनमध्ये RCBची कर्णधार आहे.

RCB आणि विराट कोहली हे नातं फारच जुनं आहे. त्यामुळेच RCB मध्ये एखाद्या नव्या खेळाडूचा प्रवेश होतो, तेव्हा त्या खेळाडूसमोर विराट कोहलीचा काही ना काही गोष्टीसाठी उल्लेख होतोच.

स्मृती मानधना आतापर्यंत भारतीय क्रिकेटची 'ब्यूटी क्वीन' म्हणून ओळखली जात होती. ती तिच्या फलंदाजीमुळे लोकप्रिय आहेच, पण त्यासोबतच तिच्या सौंदर्याचीही चर्चा असते. अशातच नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत विराट कोहलीचं नाव निघताच स्मृती मानधना पत्रकारावर भलतीच संतापल्याचे दिसून आली.

RCB च्या महिला संघाची कर्णधार झाल्यापासून स्मृती मानधनाची तुलना विराट कोहलीशी केली जात आहे. यावर स्मृती मानधनाने आपली प्रतिक्रिया दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, नेहमी हसतमुख असलेली स्मृती यावेळी मात्र काहीशी स्पष्टपणेच बोलली.

स्मृती मंधाना म्हणाली, "मी RCBची कर्णधार आहे आणि याचा मला निश्चितच अभिमान आहे. कर्णधार हा संघाचा नेता असतो. तो संघाला सोबत एकत्र घेऊन पुढे चालत राहतो. आतापर्यंत आरसीबीने जे काही साध्य केले आहे, तेथून पुढे मी संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा कायम प्रयत्न करेन."

"विराटशी माझी तुलना होत असेल तर ते मला अजिबात आवडत नाहीये. माझी विराट कोहलीशी तुलना योग्य नाही. कारण विराट कोहलीने आतापर्यंत जे काही मिळवले ते अद्वितीय आहे. मला आशा आहे की मी त्या पातळीपर्यंत पोहोचू शकेन, पण सध्या मी क्रिकेटमध्ये त्याच्या आसपासही नाही," अशा शब्दांत तिने पत्रकारांनाच सुनावले.