Join us  

४० चेंडूंत १९० धावा! Narayan Jagadeesan कडून विश्वविक्रमांचा पाऊस! रोहित, विराट, संगकारा, गेल सर्वांचे मोडले रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:18 PM

Open in App
1 / 8

Vijay Hazare Trophy : चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) रिलीज केलेल्या नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan ) याने विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy ) विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने सलग पाच वन डे सामन्यांत शतकं झळकावताना एकप्रकारे कर्णधार MS Dhoniच्या निर्णयाला कामगिरीतून उत्तर दिले.

2 / 8

तामीळनाडू संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जगदीसनने आज अरुणाचल प्रदेशविरुद्धही शतकी खेळी केली. त्याने या लढतीपूर्वी हरयाणा ( १२८ धावा), गोवा ( १६८ धावा), छत्तीसगड ( १०७ धावा) आणि आंध्र प्रदेश ( ११४* धावा) यांच्याविरुद्ध शतक झळकावले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात चार शतक झळकावण्याच्या विराट कोहली ( २००८-०९), पृथ्वी शॉ ( २०२०-२१) , ऋतुराज गायकवाड ( २०२१-२२) व देवदत्त पडिक्कल ( २०२०-२१) यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली होती.

3 / 8

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग ५ शतकांचा कुमार संगकारा ( २०१४-१५) याचा वर्ल्ड रेकॉर्ड जगदीसनने आज मोडला. संगकाराने २०१५च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत हा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. दक्षिण आफ्रिकेच्या अल्वारो पीटरसनने Highveld Lions कडून खेळताना सलग चार शतकं झळकावली होती. भारताकडून असा पराक्रम देवदत्त पडिक्कलने २०२०-२१मध्ये विजय हजारे ट्रॉफीत केला होता.

4 / 8

अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात जगदीसनने ११४ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह द्विशतक झळकावले. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात पाच शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने शतक पूर्ण करण्यासाठी ७६ चेंडूंचा सामना केला आणि पुढील १०० धावा त्याने ३८ चेंडूंत पूर्ण केल्या.

5 / 8

जगदीसन आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ४१६ धावांची भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीवीरांनी ४००+ धावांच्या भागीदारीचा पराक्रम केला. यापूर्वी २०१५मध्ये ख्रिस गेल व मार्लोन सॅम्युअल्स यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ३७२ धावांची भागीदारी केली होती.

6 / 8

जगदीसनने विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला. त्याने २२८ धावांचा टप्पा ओलांडून पृथ्वी शॉ याचा २२७ ( वि. पुद्दच्चेरी, २०२१) विक्रम मोडला. जगदीसनचे वादळ २७७ धावांवर रोखण्यात अरुणाचल प्रदेशला रोखण्यात यश आले.

7 / 8

लिस्ट ए क्रिकेटमध्ये ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सरे क्लबच्या ए ब्राऊनचा २६८ आणि रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडला. जगदीसनने १४१ चेंडूंत २७७ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत २५ चौकार व १५ षटकारांचा पाऊस होता आणि चौकार-षटकारानेच त्याने ४० चेंडूंत १९० धावा चोपल्या.

8 / 8

नारायण जगदीसनने विजय हजारे २०२२ मध्ये ६ सामन्यांत १५९ च्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत.

टॅग्स :विजय हजारे करंडकचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्माविराट कोहलीतामिळनाडू
Open in App