Join us  

विराट कोहलीच्या मक्तेदारीला धक्का; इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं पटकावला सर्वोच्च मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 5:27 PM

Open in App
1 / 10

इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं टीम इंडियचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्चस्वाला धक्का दिला.

2 / 10

स्टोक्सनं 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दमदार खेळी करताना इंग्लंडला पहिलेवहिले जेतेपद पटकावून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

3 / 10

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर स्टोक्सनं अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय खेळी करून इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

4 / 10

स्टोक्सला यंदाचा BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ दी इयर आणि आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कारही पटकावला होता.

5 / 10

ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसे पेरी हीनं यंदाचा सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता आणि तिनं विस्डनच्या या वर्षातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये स्थान पटकावले आहे.

6 / 10

महिला अॅशेस स्पर्धेत पेरीनं सर्वाधिक धावा केल्या आणि सर्वाधिक विकेट्सही घेतल्या होत्या.

7 / 10

तिच्याशिवाय इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि मार्नस लॅबुशेन आणि एसेक्स क्लबचा फिरकीपटू सिमॉन हार्मर यांनी पाच क्रिकेटपटूंमध्ये स्थान पटकावले.

8 / 10

बुधवारी स्टोक्सला यंदाचा विस्डन लिडींग क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आले आहे.

9 / 10

अँण्ड्य्रू फ्लिंटॉफनंतर ( 2005साली ) हा मान मिळवणारा स्टोक्स हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू आहे.

10 / 10

कोहलीनं सलग तीन वर्ष हा मान पटकावला होता, परंतु यंदा स्टोक्सनं बाजी मारली.

टॅग्स :बेन स्टोक्सविराट कोहली