जिच्यासोबत फोटोसाठी खाली बसला 'विराट'; 'ती' तरुणी कोण?

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा त्याच्या आक्रमक शैलीमुळे जेवढा सर्वपरिचीत आहे, तितकाच तो त्याच्या विनम्र स्वभावामुळेही अनेकांना माहिती आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा त्याच्या आक्रमक शैलीमुळे जेवढा सर्वपरिचीत आहे, तितकाच तो त्याच्या विनम्र स्वभावामुळेही अनेकांना माहिती आहे.

क्रिकेटच्या मैदानाबाहेर विराटचे असे विनम्रपणाचे अनेक क्षण फोटोत कैद झाले आहेत. यापूर्वी एका आश्रमात गेल्यानंतर, त्याचा हा साधेपणा सर्वांनीच पाहिला होता.

तर गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक टूरवर असलेल्या विराट आणि अनुष्काचे मंदिरातील हात जोडून आशीर्वाद घेतानाचेही फोटो व्हायरल झाले होते. आता, विराटचा आणखी एक फोटो चर्चेत आहे.

विराट या फोटोत एका दिव्यांग तरुणीसोबत थ्री-पीस सूटमध्ये दिसून येत असून ती तरुणीही पार्टीवेअर ड्रेसमध्ये दिसत आहे. इंडियन स्पोर्ट्स हॉनरच्या कार्यक्रमातील हा फोटो आहे.

विराट या तरुणीसोबत फोटो घेण्यासाठी खाली बसला असून विराटचे स्मीतहास्य आपुलकीचे भाव देणार आहेत. फोटोतील ती तरुणी म्हणजे भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू आहे.

अवनी लेखरा असं या तरुणीचं नाव असून तिने देशासाठी गोल्ड आणि कास्यपदक जिंकलय. १० मीटर एअर रायफल स्टँडिंगमध्ये सुवर्ण तर ५० मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कास्य पदक नावावर केलंय.

शुटींग खेळातील प्राविण्यामुळे अवनीला पद्मश्रीसह खेल रत्न, यंग इंडियन ऑफ द इयर आणि पॅरा एथलीट ऑफ द इयर या पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय. वयाच्या १२ व्या वर्षी पॅरालिसिसमुळे तिला अपंगत्व आले होते.

अवनीने स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन कोहलीसोबतचा हा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच, अखेर, विराट कोहलीची भेट झालीच, आनंद झाला असं कॅप्शन लिहिलंय. तसेच, आयपीएलसाठी आरसीबीला शुभेच्छाही दिल्या आहेत.

भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी विराट आणि बीसीसीआयलाही शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन स्पोर्टस ऑनर कार्यक्रमात अवनीचा सन्मान करण्यात आला आहे. या सोहळ्याला विराटही उपस्थित होता.

या सोहळ्यात ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रालाही सन्मानित करण्यात आलं असून अभिषेक बच्चनही पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. प्रो कबड्डीतील जयपूर पार्टनर संघाच्या मालकीसाठी अभिषेकला सन्मानित करण्यात आलंय.