Join us  

WI vs IND : १० वर्षांनंतर कसोटी संघात परतला अन् झटपट ४ शतकं ठोकली, पाकिस्तानच्या फवाद आलम ठरला आशियात हिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 11:55 AM

Open in App
1 / 6

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत आला आहे. मधल्या फळीतील फलंदाज फवाद आलमनं जमैकाच्या खेळपट्टीवर दमदार खेळी केली. ३५ वर्षीय फवादनं २१३ चेंडूंत नाबाद १२४ धावा करून संघाला मजबूत पकड मिळवून दिली आहे. त्याच्या या खेळीत १७ चौकारांचा समावेश आहे. कसोटीतील त्याचे हे पाचवे शतक आहे, तर मागील १२ महिन्यांतील चौथे शतक ठरले.

2 / 6

२००९मध्ये फवादनं अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर मागच्या वर्षी पाकिस्तान संघात पुनरागमन केलं. त्यानंतर त्यानं चार शतकं झळकावली. विशेष म्हणजे त्यानं ही पाचही शतकं वेगवेगळ्या देशांत झळकावली आहेत. २००९मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील चार शतकं ही न्यूझीलंड, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध आली आहेत.

3 / 6

फवाद आलमनं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून आणखी एक मोठा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच शतकं झळकावणारा तो आशियातील अव्वल फलंदाज ठरला. त्यानं भारताच्या चेतेश्वर पुजाराचा विक्रम मोडला. पुजारानं २४ डावांमध्ये पाच शतकं झळकावली होती, आलमनं २२ डावांत हा पराक्रम केला. सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांना २५ डावांत हा पराक्रम करता आला होता.

4 / 6

पाकिस्तानी फलंदाजांमध्ये सर्वात जलद पाच कसोटी शतक झळकावण्यात आलमनं यूनिस खान ( २८ डाव) मागे टाकले. जावेद मियाँदाद आणि सलीम मलिक यांनी प्रत्येकी २९ डावांत हा पराक्रम केला.

5 / 6

३५ वर्षीय फवाद आलमची तुलना पाकिस्तानचा सध्याचा कर्णधार बाबर आजम याच्याशी केल्यास तर बाबरनं पाच कसोटी शतकांसाठी ३५ डाव खेळले आहेत.

6 / 6

टॅग्स :पाकिस्तानवेस्ट इंडिजचेतेश्वर पुजारा
Open in App