Cricket Buzz»फोटो गॅलरी »... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का!... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का! By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:46 PMOpen in App1 / 12भारताचा सलामीवीर शिखर धवन याची पत्नी आयशा मुखर्जी ही एक किक बॉक्सर आहे आणि आजही ती फिटनेसची भरपूर काळजी घेते.2 / 1227 ऑगस्ट 1975मध्ये भारतात तिचा जन्म झाला. आयशाचे वडिल बंगाली आहेत आणि आई ब्रिटिश.. त्यामुळे आयशाकडे दोन देशांचे नागरिकत्व आहे.3 / 12आयशाचे आईवडिल बंगालमध्ये एकत्र काम करायचे आणि त्याच दरम्यान त्यांच्यात प्रेम झालं, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.4 / 12आयशाच्या जन्मानंतर तिच्या आईवडिलांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. फिटनेसच महत्त्व जाणणारी आयशा किक बॉक्सर आहे.5 / 12आयशा ही धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे आणि धवनच्या फिटनेसची ती प्रचंड काळजी घेते. आयशाचं पहिलं लग्न हे ऑस्ट्रेलियातील एका व्यावसायिकाशी झालं होतं आणि त्यांना दोन मुली आहेत.6 / 12पहिल्या पतीशी नातं तुटल्यानंतर आयशा आणि धवनची फेसबूकवर मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांना जोरावर नावाचा मुलगा आहे.7 / 12धवननं आयशाच्या दोन्ही मुलींना स्वतःचं नाव दिलं आहे. आयशा नेहमी स्पोर्ट्स लूकमध्ये दिसत आहे. लहानपणापासून तिला खेळाची आवड होती.8 / 12लहानपणी तिचं शारीरिक शोषण झालं होतं आणि आयुष्यातील त्या भयावह आठवणी असल्याचे, आयशानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 9 / 12त्या प्रसंगानंतर तिनं स्वतःला अधिक कणखर केलं आणि किक बॉक्सिंग शिकली. तिनं क्रिकेट आणि फुटबॉलही खेळले आहे. 10 / 1211 / 1212 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications