कोण घेणार द्रविडची जागा? कोचच्या शर्यतीत असलेल्या ५ चर्चित चेहऱ्यांमध्ये २ भारतीय

आघाडीच्या पाच सर्वोत्तम पर्यायामध्ये दोन भारतीय चेहऱ्यांचाही समावेश

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविड याने राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. द्रविडचा कोचिंगच्या रुपात राजस्थान संघासोबत दुसरा कार्यकाळ वर्षभराच्या आताच संपुष्टात आलाय.

फ्रँचायझी संगाने द्रविडला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण द्रविड आपल्या मतावर ठाम राहिला. त्यामुळे आता IPL २०२६ च्या हंगामाआधी संघाला नवा प्रशिक्षक शोधावा लागणार आहे.

इथं एक नजर टाकुयात राहुल द्रविडनंतर कोण होऊ शकतं राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक? जाणून घेऊयात चर्चेत असणारे चेहऱ्यांबद्दल

श्रीलंकेचा माजी फलंदाज आणि कर्णधार कुमार संगकारा हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्याशी खूप दिवसांपासून कनेक्टेड आहे. द्रविड प्रमुख प्रशिक्षक असतानाही तो सपोर्ट स्टाफचा भाग होता. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं त्याला डायरेक्टर ऑफ क्रिकेट हे पद दिले होते. द्रविडनं राजीनामा दिल्यावर तो कोचच्या रुपात दिसू शकतो.

आपल्या कोचिंगमध्ये नाईट रायडर्सच्या संघाला २०२४ चे जेतेपद मिळवून देणारा भारतीय क्रिकेट कोचिंगमधील प्रसिद्ध चेहरा अर्थात चंद्रकांत पंडित यांचाही पर्याय राजस्थानवाले आजमावू शकतात. चंद्रकांत पंडित हे देशांतर्गत क्रिकेटधील सर्वोत्तम कोच पैकी एक आहेत. आयपीएलमधील कोचिंगचा अनुभव त्यांना या शर्यतीत आणणारा आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेला दिग्गज फिरकिपटू अनिल कुंबळे हा देखील राहुल द्रविडचा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आयपीएलमध्ये कुंबळेंनी मुंबई इंडियन्ससह कोचिंग स्टाफसह पंजाब किंग्जलाही मार्गदर्शन दिले आहे.

परदेशी कोचच्या रुपात पर्याय आजमावताना जेसन गिलेस्पी या नावाचाही विचार राजस्थान रॉयल्सचा संघ करु शकतो. गिलेस्पी याने पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक झाला होता. पण वादामुळे त्याने पद सोडले होते. आयपीएलमध्ये हा चेहरा पंजाबचा गोलंदाजी कोच राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांनी कोचिंगमध्ये आपली खास छाप सोडलीये. टीम इंडियाशिवाय आरसीबी, गुजरात टायटन्स यासारख्या आयपीएल संघासोबतही त्यांनी काम केले आहे.